शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भुरट्या खरेदीला राज्य सरकारची साथ

By admin | Updated: February 4, 2017 01:43 IST

‘१७ जानेवारीपासून कोणत्याही विभागाने ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची खरेदी करू नये’ या वित्त विभागाच्या आदेशामुळे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण

- अतुल कुलकर्णी,  मुंबई‘१७ जानेवारीपासून कोणत्याही विभागाने ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची खरेदी करू नये’ या वित्त विभागाच्या आदेशामुळे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील भुरट्या खरेदी करणाऱ्यांनी दिवाळीच साजरी करणे सुरू केले आहे. या आदेशाच्या आडून आता दररोज ‘गरज आहे’ या गोंडस कारणाखाली वाट्टेल त्या बाजारभावाने औषधांची खरेदी चालू झाली आहे.३१ मार्चला आर्थिक वर्ष संपते. त्या वेळी अनेक विभाग निधी वाया जाऊ नये म्हणून वाट्टेल त्या वस्तू खरेदी करण्याचा सपाटा लावतात, शेवटच्या दिवशी लाखो रुपयांच्या खरेदीचे आदेश दिले जातात आणि खरेदी झाली असे दाखवून पैसेही दिले जातात. या वृत्तीला आळा बसावा म्हणून वित्त व नियोजन विभागाने या वर्षी १७ जानेवारीपासून कोणत्याही विभागाने ५० हजारांच्या वर खरेदी करायची नाही, असे आदेश काढले.या निर्णयाचा फटका मात्र जे.जे. हॉस्पिटलला बसला आहे. या ठिकाणी राज्यभरातून रुग्ण येत असतात. त्यांची संख्या आणि त्यांना लागणारी औषधे यांची सांगड घालण्यासाठी जे.जे.मध्ये दर तीन महिन्यांनी दरकराराच्या आधारे औषध खरेदीचे आदेश दिले जातात. दरवर्षी हे आदेश फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात काढले जातात, पण ते या वर्षी जानेवारीतच काढले गेल्याने जानेवारीत जे आदेश देण्यात येणार होते ते देताच आले नाहीत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. यासाठी हे आदेश शिथिल करावेत, अशी मागणी आपण आणि सहयोगी अधिष्ठाता संजय निर्भावने यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे केली असली तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.डॉ. लहाने यांनी वस्तुस्थिती लेखी पत्राद्वारे कळवली, मात्र राज्यभरात जिल्हा रुग्णालये, तसेच अन्य वैद्यकीय महाविद्यालयांमधून या निर्णयाचा वेगळाच फायदा घेणे सुरू झाले आहे. आमच्याकडे औषधे नाहीत आणि दरकराराच्या खरेदीवर मर्यादा आहेत, अशी कारणे सांगत खुल्या बाजारातून चढ्या दराने राज्यभर औषध खरेदी चालू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ही खरेदी करताना ज्या ठिकाणाहून ही खरेदी होते त्यांच्याशी टक्केवारीचे साटेलोटे करून ही खरेदी होते आणि परिणामी ज्या हेतूने वित्त विभागाने हा आदेश काढला त्या हेतूलाच हरताळ फासला जात असल्याचेही ते अधिकारी म्हणाले. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे ९०४ कोटींचा निधी मंजूर असताना त्यातील जवळपास ७०० कोटी रुपये खर्चच झालेले नाहीत. एवढी टोकाची अनास्था मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग दाखवत आहे.आरोग्य विभागाला हा आदेश लागू नाही. तरी पण त्यांना काही शंका असेल आणि या आदेशाचा अर्थ काढण्यात काही चुकत असेल तर त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव पाठवावा, आम्ही त्यावर खुलासा करू. पण या निर्णयाचा आधार घेऊन जर कोणी वेगळ्या पद्धतीने रुग्णांची आणि सरकारी निधीची लूट करत असेल तर ते होऊ देणार नाही.- सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री, महाराष्ट्र राज्य