शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

... तर राज्य सरकार मागासलेलेच!

By admin | Updated: March 7, 2017 04:16 IST

पोलिसांना अद्ययावत शस्त्रास्त्रे द्या, असा आदेश वारंवार देऊनही पोलीस अजून जुन्या काळातील शस्त्रे वापरून संरक्षण करत आहेत.

मुंबई : पोलिसांना अद्ययावत शस्त्रास्त्रे द्या, असा आदेश वारंवार देऊनही पोलीस अजून जुन्या काळातील शस्त्रे वापरून संरक्षण करत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत दुनिया आघाडीवर आहे, तर राज्य सरकार आजही मागासलेले आहे, अशी खंत उच्च न्यायालयाने व्यक्त केली.हवालदारांकडे शस्त्र नसल्याने त्यांच्यावर कोणीही येऊन हल्ला करतात. त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे, अशी राज्याच्या पोलिसांची परिस्थिती आहे. कोणीही या परिस्थितीचा आढावा घ्यायला तयार नाही. आम्ही यासंदर्भात वारंवार आदेश देऊनही अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त करत म्हटले. पुण्याच्या अश्विनी राणे यांनी त्यांचे पती निखील राणे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. राणे यांची हत्या २३ नोव्हेंबर २००९ रोजी गोळ्या झाडून करण्यात आली. स्थानिक पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने अश्विनी राणे यांनी या केसचा तपास सीबीआयकडे करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सीबीआयही याप्रकरणाचा तपास करण्यामध्ये अपयशी ठरली. त्यामुळे उच्च न्यायालयाने पोलीस दलातील त्रुटी दूर करण्यासाठी ही याचिका निकाली न काढता याचिकेची व्याप्ती वाढवली.सोमवारच्या सुनावणीत खंडपीठाने राज्य सरकारच्या कारभारावर असमाधान व्यक्त केले. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचा अन्य देशांत कशाप्रकारे तपास करण्यात येतो, हे राज्य सरकारने पहावे. ते अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणेच्या आधारे तपास करतात. राज्य सरकारने बोटांच्या ठशांची बँक तयार केली पाहिजे. गंभीर गुन्ह्याच्या तपासावेळी हे उपयोगी पडेल. पोलिसांच्या ढिसाळ तपासामुळे खरे गुन्हेगारही संशयाचा फायदा घेत सुटतात आणि ते आणखी गुन्हे करतात. पोलिसांच्या नाशिक अ‍ॅकेडमीमध्ये अद्ययावत शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण द्या, असे खंडपीठाने घेत म्हटले. (प्रतिनिधी)>दहशतवाद, हत्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास जुन्या पद्धतीने न करता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन करावा. आम्हाला हे म्हणायला अत्यंत खेद वाटतो की अन्य देश तपाससाठी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना महाराष्ट्र आणि अन्य राज्य याबाबत मागास आहेत- मुंबई उच्च न्यायालय