शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गौरव सोहळ्यात रंगणार राजकीय जुगलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 05:03 IST

विधिमंडळात नेमके होते तरी काय, हा प्रश्न नेहमीच अनेकांना पडत असतो.

मुंबई : विधिमंडळात नेमके होते तरी काय, हा प्रश्न नेहमीच अनेकांना पडत असतो. प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले हे मान्यवरांकडून याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. ‘संसदीय कार्यात महिला लोकप्रतिनिधींचे योगदान आणि त्यांना येणाऱ्या अडचणी’ या परिसंवादाचे सूत्रसंचालन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे करणार आहेत तर ‘विधिमंडळ गोंधळासाठी की कायदे बनविण्यासाठी’ यावर राजकीय विश्लेषक माजी आ. उल्हास पवार हे ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधणार आहेत. लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भरगच्च अशी राजकीय मेजवानी आणि जुगलबंदी अनुभवता येणार आहे. ३ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात हा सोहळा रंगणार असून, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. विधिमंडळ गोंधळासाठी की कायदे बनविण्यासाठी, या परिसंवादात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख सहभागी होणार असून राजकीय विश्लेषक माजी आ. उल्हास पवार हे सूत्रसंचालन करणार आहेत.एरवी पत्रकारांच्या प्रश्नांना लिलया समोरे जाणारे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, पर्यावरण मंत्री रामदास कदम, माजी गृहमंत्री जयंत पाटील, आमदार दिलीप सोपल आणि माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे हे या कार्यक्रमात प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांच्या खुसखुशीत प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. विधीमंडळात महिला आमदार कोणते प्रश्न उपस्थित करतात? या विषयावर आ. मंदा म्हात्रे, आ. निलमताई गोऱ्हे, आ. विद्या चव्हाण आणि आ. यशोमती ठाकूर यांच्याशी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे संवाद साधणार आहेत. त्यामुळे आर. आर. पाटील फाउंडेशन प्रस्तुत या पुरस्कार सोहळ्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. (विशेष प्रतिनिधी)