शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

राज्याला वीज दरवाढीचा झटका!

By admin | Updated: November 5, 2016 08:28 IST

राज्यातील जनतेला महावितरणने वीज दरवाढीचा झटका दिला आहे. घरगुती वीजबिल पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने वाढणार आहे.

पुणे/मुंबई : राज्यातील जनतेला महावितरणने वीज दरवाढीचा झटका दिला आहे. घरगुती वीजबिल पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. यंदा १.४९ टक्के दरवाढ होणार असून, १ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या सुधारित वीज दरानुसार डिसेंबरचे बिल आकारले जाणार आहे.विद्युत नियामक आयोगाने वीज दरात वाढ करण्यास महावितरणला परवानगी दिली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांवर चार वर्षांत टप्प्याटप्प्याने ९ हजार १४९ कोटी रुपयांच्या दरवाढीचा बोजा पडेल, तर वाणिज्य ग्राहकांच्या दरात अल्प घट होईल. या वर्षी १.४९ टक्के तर २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० साली अनुक्रमे २, १.२०, १.२७ टक्के अशी दरवाढ होईल. आर्थिक वर्षांत नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ अखेरीपर्यंत दरात प्रति युनिट २ ते ४ पैशांची वाढ होणार असून, पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल. स्थिर बिल आकार ५०वरून ५५ रुपये तर थ्री फेज वीज जोड असलेल्या ग्राहकांच्या स्थिर आकारात दीडशेवरून १६० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कृषी ग्राहकांसाठीच्या दरांमध्ये अल्पशी वाढ झाली असली तरी (पान २ वर) (पान १ वरून) सुधारित वीजदर सरासरी पुरवठा खर्चाच्या केवळ ५० टक्क्यांहून थोडा अधिक असणार आहे. तथापि अद्यापही सुमारे ३६ टक्के कृषी ग्राहकांनी मीटर बसवलेले नाहीत. मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला गती यावी याकरिता मीटर बसवलेले नाहीत; अशा कृषी पंपांकरिता, विशेषत: ज्यांच्या जोडण्यांचा भार ७.५ एचपी पेक्षा अधिक आहे. त्यांच्या वीजदरात आयोगाने वाढ केली आहे. आयोगाने मागणी आकारात (डिमांड चार्जेस) अल्पशी वाढ केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>९ हजार १४९ कोटींची दरवाढमहावितरणने २०१४-१५साठी अचूक समायोजन व २०१५-१६मध्ये तात्पुरते समायोजन, तर २०१६ ते २०२० या अर्थिक वर्षांसाठी ५६ हजार ३७२ कोटी रुपयांची वीजदरवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यापैकी २८ हजार ५२२ कोटी रुपयांची दरवाढ मान्य करण्यात आली. परंतु महावितरणने इंधन समायोजनापासूनचे १९ हजार ३७३ कोटी रुपये महसुलात दाखविले नव्हते. त्यामुळे महावितरणने पुढील चार वर्षांत ९ हजार १४९ कोटी रुपयांची दरवाढ लागू करण्यास मान्यता दिली आहे. >महावितरणच्या वीज दरात वाढ झाली असली तरी सर्व सामान्य वीज ग्राहकांचा आयोगाने विचार केला आहे. कृषीक्षेत्र वगळता उद्योग आणि घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे. विशेषत: उद्योग क्षेत्राला दिलासा देण्यात आला असून, प्रत्येक वर्षांत निवासी ग्राहकांच्या (दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांसहित) सरासरी आकारणी दरात १.० ते १.३ टक्क्यांच्या मर्यादेत अल्पशी वाढ करण्यात आली आहे.- प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ>शिवाय उद्योगासाठी ऊर्जा आकार (एनर्जी चार्जेस) कमी करण्यासाठी प्रयत्न केला आहे. येत्या चार वर्षांमध्ये उच्च दाब आणि लघू दाब उद्योगांच्या एकूण सरासरी आकारणी दरामध्ये अल्पशी म्हणजे सुमारे ०.४ ते ०.५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. >भरपूर वीज उपलब्धआयोगाने वीज खरेदीचे परिमाण व खर्चास मंजुरी दिली आहे. चालू वर्षी सुमारे २५ हजार दशलक्ष युनिट्स वीज उपलब्ध होईल. आणि यात २०१९-२० या वर्षाच्या अखेरीस ४२ हजार दशलक्ष युनिट्सपर्यंत वाढ होईल.