शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य नाट्य स्पर्धा रत्नागिरीत

By admin | Updated: October 21, 2014 23:40 IST

सांस्कृतिक संचालनालय : १२ नोव्हेंबरपासून होणार प्रारंभ

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईतर्फे ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस दि.१२ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे या स्पर्धा होणार असून जिल्ह्यातील एकूण १८ नाटकांचे सादरीकरण होणार आहे. गेल्यावर्षीही ही स्पर्धा रत्नागिरीत झाली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता सांस्कृतिक कला संचालनालयाने याहीवर्षी रत्नागिरीत ही स्पर्धा आयोजित केली आहे.दररोज सायंकाळी ७ वा.नाटकांचे सादरीकरण केले जाणार आहे. १२ रोजी ‘मेला तो शेवटचा होता’ (अजिंक्यतारा थिएटर्स, गणेशगुळे), दि. १३ रोजी ‘महाभारत अग्निकांड’ (आभार सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ, विश्वनगर), दि.१४ रोजी ‘लेकुरे उदंड झाली’ (बाबा वर्दम थिएटर्स,कुडाळ), दि. १५ रोजी ‘चांदणवेल’ (कोकण मराठी साहित्य परिषद, लांजा) सादर करणार आहेत.दि.१७ रोजी ‘काळोख देत हुंकार’ (महाकाली रंगविहार, नाणिज), दि१८ रोजी ‘काळोख देत हुंकार’(नेहरू युवा आॅल मुव्हमेंटस् आॅर्गनायझेशन, धुंदरे), दि.१९ रोजी ‘गोष्ट एका शाळेची’(ओम साई मित्र मंडळ, नाचणे), दि.२० रोजी ‘सुखांशी भांडतो आम्ही’ (साईकला क्रिडा मंच, कुडाळ) ही नाटके सादर होणार आहेत. दि.२१ रोजी ‘लोककथा ७८’ (संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ), दि.२२ रोजी ‘प्यादी’ (संकल्प कलामंच, मारूतीमंदिर), दि.२३ रोजी ‘तुझ्याविना’ (क्षितीज नाट्यसंस्था, बाणखिंड), दि.२४ रोजी ‘सुखांशी भांडतो आम्ही’ (श्रीरंग नाट्यसंस्था, नाचणे), दि.२५ रोजी ‘खेळ’ (स्टार थिएटर्स, आदर्शनगर), दि.२६ रोजी ‘द इंटरपिटर’ (सांस्कृतिक कलामंच, देवरूख), दि.२७ रोजी ‘पुन्हा एकदा वसंत’(जुगाई कलामंच कोसुंब), दि.२८ रोजी कर्मभोग (सुमती थिएटर्स, तांबटआळी), दि.२९ रोजी ‘तुका अभंग अभंग’ (उत्कर्ष युवा मंडळ सावंतवाडी) अशी नाटके सादर करण्यात येणार आहे.राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील १४ नाट्यसंस्था नाटक सादर करणार असून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील केवळ ४ संस्था स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता रत्नागिरी, लांजा, देवरूख, संगमेश्वर येथील ४ तर दस्तुरखुद्द रत्नागिरी शहरातील १० संस्था स्पर्धेत सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)अठरा नाटकांचे होणार सादरीकरणदररोज सायंकाळी ७ वाजता होणार नाटकांचे सादरीकरण.रत्नागिरी जिल्ह्यातील १४ नाट्यसंस्थांचाही सहभाग.सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ४ नाट्यसंस्था होणार सहभागी.