शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शुल्कवाढ प्रकरणाला राजकीय रंग

By admin | Updated: June 4, 2017 00:07 IST

मुंबईसह राज्यात पेटलेल्या शुल्कवाढीच्या प्रश्नाला आता राजकीय रंग चढू लागले आहेत. खासगी शाळांमध्ये होणाऱ्या वारेमाप शुल्कवाढीला आळा घालण्यासाठी पालकांनी

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईसह राज्यात पेटलेल्या शुल्कवाढीच्या प्रश्नाला आता राजकीय रंग चढू लागले आहेत. खासगी शाळांमध्ये होणाऱ्या वारेमाप शुल्कवाढीला आळा घालण्यासाठी पालकांनी उभ्या केलेल्या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे नेतेमंडळी सहभागी होताना दिसत आहेत. दहिसर येथील युनिव्हर्सल हाय शाळेतील पालकांनी शनिवारी राज्यपालांची भेट घेतली. या वेळी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनीही राज्यपालांना मनमानी शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली. एप्रिल महिन्यापासून मुंबई-पुणे शहरात पालकांनी एकत्र येऊन शुल्कवाढीविरोधात आंदोलन पुकारले आहे. शाळेची शुल्कवाढ दरवर्षी करण्यात येते. त्यामुळे आता शाळांचे शुल्क हे लाखोंच्या घरात पोहोचले आहे. प्रत्येक पालकाला हे शुल्क परवडते असे नाही. दोन मुले शिकत असल्यास पालकांवर अधिक बोजा पडतो. त्यामुळे पालकांनी सुरू केलेल्या आंदोलनात राजकीय पक्ष सहभागी होताना दिसत आहेत. राज्यपालांच्या भेटीदरम्यान पालकांनी शुल्कवाढीबाबत शाळेविरोधात पाढा वाचून दाखवला. राज्यपालांना शुल्कवाढीविरोधात एक निवेदन देण्यात आले आहे. राज्यातील शाळांच्या शुल्क नियंत्रणासाठी कायदा अस्तित्वात आहे. पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. कायद्यानुसार, शाळा प्रत्येक वर्षी शुल्कवाढ करू शकत नाही. तरीही कायद्याचे उल्लंघन करून शाळांमध्ये १५ टक्क्यांनी शुल्कवाढ करण्यात येते. पालकांचे होत असणारे आर्थिक शोषण थांबावे यासाठी राज्यपालांची भेट घेतली, असे शिष्टमंडळातर्फे सांगण्यात आले. राज्यपालांनी यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. दहिसर येथील युनिव्हर्सल हाय शाळेतील शुल्कवाढीप्रकरणी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. तर शिक्षण शुल्क समितीपुढे झालेल्या सुनावणीत भाजपा नगरसेवकदेखील पोहोचले होते.