शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

राज्य गुदमरतेय! प्रदूषणांच्या जाळ्यात , मुंबई लागोपाठ नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:59 IST

जागतिक आरोग्य संघटनेने प्रदूषित शहराचा अहवाल सादर केला आहे.

कुलदीप घायवटमुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने प्रदूषित शहराचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात जगातील वाढत्या प्रदूषणांमध्ये दिल्लीचा प्रथम क्रमांक असून दिल्लीनंतर मुंबईचा क्रमांक लागतो. त्यामुळे मुंबईची दिल्लीसारखी अवस्था होण्याची वेळ आली आहे. राज्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्प, मेट्रो प्रकल्प, बांधकामाची ठिकाणे, विकासात्मक कामे यामुळे प्रदूषणाची वाढ होत आहे. राज्यातील पॉर्टीक्युलेट मॅटरची (पीएम) आकडेवारी वाढत असताना दिसून येत आहे. गुरुवारी केलेल्या सर्वेक्षणानुसार पीएम आकडेवारी- नाशिक ११८ पीएम, औरंगाबाद ९२ पीएम, पुणे ७८ पीएम, नागपूर ७० पीएम आहे. वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी एकमेव उपाय म्हणून झाडेच लावण्याची आवश्यकता आहे. तसेच जी झाडे आहेत त्यांना वाचवणे गरजेचे आहे. सार्वजनिक सुविधा म्हणून बसचा वापर केला जावा. सरकार झाडे लावण्याच्या जाहिराती करत आहे. ते फक्त झाडे लावण्याच्या जाहिरातीपुरते मर्यादित राहावे तसेच सरकारने विकास करताना पर्यावरणाचादेखील विचार करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत यांनी सांगितले की, राज्यातील वाढत्या प्रदूषणाला वाढणाऱ्या चारचाकी गाड्यांची संख्या कारणीभूत आहे. मुंबईमध्ये ३७ लाख गाड्या दररोज धावत आहेत. यात रोज ५०० गाड्यांची भर पडतेय. यामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. एका मोटार गाडीतून १ हजार संयुगे बाहेर पडतात. मुंबईतील खरी सार्वजनिक वाहतूक म्हणजे बेस्ट, पण या बेस्ट बसचा ताफा कमी करण्यात आला आहे. चार टक्के जागा व्यापणारी बस ६१ टक्के लोकांना सेवा देत आहे. तर कार मात्र ८४ टक्के जागा व्यापून ७ टक्के लोकांना सेवा देत आहे. यामुळे मुंबईतील वाहतूककोंडी, वायुप्रदूषण वाढत आहे. सरकारने सार्वजनिक वाहतूक म्हणून मेट्रो, मोनो सेवा आणली. मात्र ही सेवा महाग, क्षमता नसणारी, सर्वत्र पोहोचणारी नाही. या सेवा देण्यापेक्षा बसची संख्या वाढविणे आवश्यक आहे.प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून आजतागायत झाले नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती मुंबईत तरी बदलणे कदापि शक्य नाही. - डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्तीप्रदुषणाचा हेरिटेज वास्तूंना धोका आहे. वास्तूवर पोपडी तयार होऊन वास्तूचा खरा रंग उडत आहे. हेरिटेज वास्तूंवर काळे डाग पडत आहेत. 

चेतन रायकर, सदस्य, मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटीभारतीय मानकांनुसार पीएम १०चे वार्षिक मानक सरासरी ६० मायक्रॉन घनमीटर आणि पीएम २.५चे वार्षिक मानक सरासरी ४० मायक्रॉन घनमीटर आहे.- डॉ. वि.मो. मोटघरे, सहसंचालक, प्रदूषण महामंडळ