शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

राज्यात एटीएम पुन्हा कॅशलेस

By admin | Updated: May 10, 2017 01:59 IST

रिझर्व्ह बँकेकडून पुरेशी रोकड उपलब्ध करुन दिली जात नसल्याने राज्यात मुंबईबाहेर बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम कॅशलेश झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रिझर्व्ह बँकेकडून पुरेशी रोकड उपलब्ध करुन दिली जात नसल्याने राज्यात मुंबईबाहेर बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम कॅशलेश झाले आहेत. त्यामुळे महानगरे व निमशहरे व ग्रामीण भागात लोकांना रोकडअभावी व्यवहार करताना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यातच महिन्याच्या १ ते १० तारखेपर्यंत पगाराचे दिवस असल्याने खात्यात पैसे असूनही ते हातात मिळत नसल्याने पुन्हा चलन टंचाई निर्माण झाली आहे.‘लोकमत’ने संपूर्ण राज्याचा आढावा घेतल्यानंतर मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सोलापूर, कोल्हापूर भागात एटीएम पुन्हा कोरडे पडले असल्याचे आढळले. विशेष म्हणजे बँक आॅफ महाराष्ट्रच्या नाशिक विभागीय व्यवस्थापकांनी रिझर्व्ह बँके कडे मागणी करूनही नवीन नोटांचा पुरवठा होत नसल्याने एटीएममध्ये रोकड जमा करण्यात अडचणी येत असल्याची कबुली दिली.विदर्भात लोकांचे हाल विदर्भात गडचिरोली वगळता बहुतांश शहरांमध्ये सर्वच बँकांच्या एटीएममध्ये ठणठणाट दिसून आला. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील एटीएममध्ये जवळपास महिन्यापासून रोकडच नसल्याने लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे. एटीएमबाहेर रांगा असल्याचे चित्र यवतमाळमध्ये दिसले. अमरावती जिल्ह्यातील २०० च्या वर एटीएम कॅशलेस असल्याचे आढळून आले. अमरावती जिल्ह्यातील २०० च्या वर एटीएममध्ये ठणठणाट आहे. वर्धा जिल्ह्यातही तशीच स्थिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ९० टक्के एटीएम रिकामे झाले आहेत. अपवाद फक्त नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश सर्व बँकांचे एटीएम पैशांनी भरून असल्याचे मंगळवारी दिसून आले. राष्ट्रीयकृत बँकांसह गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०० वर एटीएममधून सुरळीतपणे पैसे मिळत असल्याचे दिसून आले. यवतमाळातील १९८ पैकी १५४ एटीएममध्ये पैसे नाहीत. मराठवाड्यात चलनकल्लोळ-मराठवाड्यात रिझर्व्ह बँकेच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे एटीएममध्ये खडखडाट आहे. लातूरला एक-दोन एटीएम वगळता सर्वच एटीएमचे ‘शटर डाऊन’ आहेत. बीडमध्ये ऐन लग्नसराईत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी मंजूर झालेले पैसे मिळणे मुश्किल बनले आहेत. सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांचे वाटप रखडले आहेत. औरंगाबाद शहरासाठी पगारी आठवड्यात सोमवारी अवघे ७९ कोटी रुपयेच बँकांना पाठविण्यात आले. नांदेड जिल्ह्यात महिनाभरापासून बहुतांश एटीएम केंद्रात खडखडाट असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे़ परभणी जिल्ह्यात दररोज २५ कोटींची रोकड तूट जाणवत आहे. सद्यस्थितीमध्ये केवळ २५ कोटी रुपयेच उपलब्ध होत आहेत. खान्देशात ठणठणाट-खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचा चलनपुरवठा कमी झाल्याने एटीएम बंदचे संकट ओढवले आहे. जळगावात ६८ एटीएमपैकी फक्त ४५ कार्यरत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील १०५ राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांकडे आठवडाभर पुरेल एवढीच रोख रक्कम आहे़ जिल्ह्यातील ६० पैकी निम्मे एटीएम पैशांविना बंद आहेत़ पुणे, सोलापूर, नाशिक, नगरला धावाधाव-पुण्यातही एटीएममध्ये खडखडाटच आहे. सोलापूरमध्ये १,२४१ पैकी बरीचशी एटीएम बंद आहेत. नाशिकमध्ये ५० टक्क्यांहून अधिक एटीएम रिकामे आहेत. अहमदनगरमधील एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. नगरमधील सर्वच बँकांमध्ये ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम उपलब्ध करून दिली जात आहे.रिझर्व्ह बँके कडून मागणी करूनही नवीन नोटांचा पुरवठा होत नसल्याने एटीएममध्ये रोकड जमा करण्यात अडचणी येत आहेत. बँकेत १०, २० व ५० रुपयांच्या चलनाची शिल्लक आहे. ती एटीएममध्ये टाकता येत नाही. नोटाबंदीनंतर बँकेत पैसे भरण्याचे प्रमाण कमी झाले असून नवीन चलन पुरवठा होत नसल्याने अशा समस्या उद्भवू लागल्या आहेत.- आर. एम. पाटील, विभागीय व्यवस्थापक, बँक आॅफ महाराष्ट्र