शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑर्थोपेडिक इम्प्लांट’ च्या अवैध कारखान्यांची राज्यभर शोधमोहीम

By admin | Updated: February 17, 2017 02:54 IST

अन्न व औषध प्रशासनाची मोहीम; मोठय़ा शहरांवर लक्ष

सचिन राऊतअकोला, दि. १६- मानवी शरीरातील दोन तुटलेले हाड जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या 'ऑर्थोपेडिक इम्प्लांट'ची निर्मिती करणार्‍या अवैध कारखान्यांच्या शोधासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभर शोधमोहीम राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. राज्यातील मोठय़ा शहरातील अशा कारखान्यांवर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.'ऑर्थोपेडिक इम्प्लांट'ची निर्मिती करणारे कारखाने तसेच या साहित्याची खरेदी-विक्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना बंधनकारक असतानाही विना परवाना असलेल्या कारखान्यातून ह्यऑर्थोपेडिक इम्प्लांटह्णची निर्मिती करण्यात येत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. त्यामुळे खळबडून जागे झालेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाने ह्यऑर्थोपेडिक इम्प्लांटह्णची निर्मिती करणार्‍या कारखान्यांच्या तपासणीसाठी राज्यभर शोधमोहीम हाती घेतली आहे. या शोधमोहिमेत ह्यऑर्थोपेडिक इम्प्लांटह्णची विना परवाना उत्पादन करणार्‍या कारखान्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यानंतर सदर कारखाने ह्यसीलह्ण करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. भिवंडी, डोंबीवली, वसई, नवी मुंबई, नांदेड, ठाणे, अकोला या ठिकाणच्या ह्यऑर्थोपेडिक इम्प्लांटह्णचे उत्पादन करणार्‍या कारखान्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यातील भिवंडी, डोंबिवली, वसई, नवी मुंबईत आणि परराज्यातील गुजरातमधील ह्यऑर्थोपेडिक इम्प्लांटह्णची निर्मिती करणार्‍या कारखान्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना नसल्याचेही काही प्रकार आता उघड झाले आहेत. ही शोध मोहीम उर्वरित शहरांमध्येही राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.'ऑर्थोपेडिक इम्प्लांट'चे उत्पादन करणार्‍या कारखान्यांचा शोध अन्न व औषध प्रशासन विभागाकडून घेण्यात येत आहे.विना परवाना चालविण्यात येत असलेल्या कारखान्यांची तपासणी करून त्यांचे परवाने तपासण्यात येत आहेत. मोठय़ा शहरांमध्ये ही तपासणी करण्यात येत असून, राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात ही तपासणी होणार असून, अवैध कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.हर्षदीप कांबळे आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य.अवैध कारखान्यांवर होणार जप्तीची कारवाई

राज्यात ह्यऑर्थोपेडिक इम्प्लांटह्णची अवैधरीत्या निर्मिती करणार्‍या कारखान्यांवर जप्तीची कारवाई होणार आहे. राज्यातील सर्वच कारखान्यांचे परवाने आता तपासण्यात येणार आहेत. बहुतांश कारखान्यांनी वैद्यकीय मापदंड पूर्ण केलेला नसतानाही ह्यऑर्थोपेडिक इम्प्लांटह्णची निर्मिती सुरूकेल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.