शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅलिम्पिक’पदकांसाठी राज्याचा कृती आराखडा!

By admin | Updated: October 18, 2015 23:42 IST

२० पदकांचे उद्दिष्ट: कार्यकारी समिती स्थापन

राम मगदूम - गडहिंग्लज २०२० मध्ये टोकियो-जपान येथे होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये राज्यातील खेळाडूंनी किमान २० पदके मिळवावीत, अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने कृती आराखडा तयार करून त्यासंबंधीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने खास कार्यकारी समितीची स्थापना केली आहे.प्रतिभावान खेळाडू घडविण्यासाठी खेळांच्या पायाभूत सुविधा, क्रीडा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन, सराव आणि प्रशिक्षणासाठी पुरेसे साहित्य, प्रशिक्षणाचा कृती आराखडा, खेळातील कौशल्यांवर प्रभुत्व येण्यासाठी सराव, नियमित प्रशिक्षण, स्पर्धा व खेळाडूंच्या सकारात्मक मानसिकतेसाठी मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आहार तज्ज्ञ, मसाजिस्ट, दुखापती इलाजासाठी फिजीओथेरपिस्ट, आदी सोयी-सुविधा व मार्गदर्शन खेळाडूंना पुरविण्याची गरज आहे. या बाबी उपलब्ध करण्यासाठीच राज्याने ही समिती स्थापन केली आहे.क्रीडा व युवक सेवा सहसंचालक हे या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत. उपसंचालक, महाराष्ट्र आॅलिम्पिकचे सचिव बाळासाहेब लांडगे, भारती आॅलिम्पिक संघटना व मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे नामदेव शिरगावकर, राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कारप्राप्त अंजली भागवत, माजी आॅलिम्पियन निखील कानिटकर, भारती अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रल्हाद सावंत, कुस्तीमधील आॅलिम्पियन अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि बॉक्सिंमधील आॅलिम्पियन अर्जुन पुरस्कार विजेते गोपाळ देवांग यांचा सदस्यांमध्ये समावेश आहे.बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडापीठाचे उपसंचालक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. त्याचप्रमाणे याकामी विविध खेळांतील तज्ज्ञ, खेळाडू आणि मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यालयीन कामकाजासाठी शासन स्वतंत्र कक्ष देखील स्थापन करणार आहे.समितीची जबाबदारीप्रतिभासंपन्न खेळाडूंच्या निवडीसाठी पात्रता व निकष निश्चित करणे आणि खेळाडूंच्या निवडीस अंतिम स्वरूप देणे.निवड झालेल्या खेळाडूंच्या प्रशिक्षण सुविधा, प्रशिक्षण ठिकाण निश्चित करणे.तज्ज्ञांची, क्रीडा मार्गदर्शकांची समिती स्थापन करणे .क्रीडावैधकशास्त्र, भौतिक उपचारशास्त्र, क्रीडामानसशास्त्र, आहारशास्त्र, आदी तज्ज्ञांचे सहकार्य घेण्याबाबत निर्णय घेऊन अंमलबजावणी करणे.मान्य खेळांचे खेळनिहाय वार्षिक, पंचवार्षिक अंदाजपत्रक समितीच्या मान्यतेने शासनास सादर करणे.