शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ३0 उपकेंद्रांना मंजुरी चार नवीन ग्रामीण रुग्णालयांचाही समावेश

By admin | Updated: June 12, 2014 19:08 IST

२00१ च्या लोकसंख्येच्या आधारावर आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने बृहत आराखडा तयार केला आहे.

अकोला : राज्यात २00१ च्या लोकसंख्येच्या आधारावर आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने बृहत आराखडा तयार केला आहे. त्यानुसार राज्यातील ५६ रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढविणे आणि १,२५२ नवीन आरोग्य संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आराखड्यानुसार चार ग्रामीण रुग्णालयांसह १९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३0 उपकेंद्रांना मंजुरी देण्याचा निर्णय सोमवारी राज्य शासनाने घेतला. शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार विदर्भातील अमरावती जिल्‘ात कांडली, गडचिरोली जिल्‘ात बुरगी कादोडी, लखमापूर बोरी, कोठी, गोंदिया जिल्‘ात चिखली, चंद्रपूर जिल्‘ात बीबी, भंगाराम तळोधी, विरूर स्टेशन आणि यवतमाळ जिल्‘ात बोधेगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय अहमदनगर जिल्‘ात सात्रळ, कौठे, कमळेश्वर, पेमगिरी, कोल्हापूर जिल्ह्यात पाचगाव, बीड जिल्‘ात दिंद्रुड, रत्नागिरी जिल्‘ात तुरंबव, सांगली जि‘ात देवराष्ट्र, वांगी आणि वाटेगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. लोकसंख्येच्या आधारावर प्राथमिक आयोग्य केंद्रांच्या हद्दीत ३0 नवीन उपकेंद्रे सुरू केली जात आहे. यात १0 विदर्भातील गोंदिया, यवतमाळ जिल्‘ात सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्‘ात घुग्गुस येथे नवीन ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. नाशिकमध्ये दळवट, पुणेमध्ये उरळीकांचन आणि सांगली जिल्‘ात हातनूर येथे नवीन ग्रामीण रुग्णालय सुरू होईल. गडचिरोली जिल्‘ातील धानोरा येथील रुग्णालयातील खाटांची संख्या ३0 वरून ५0 करण्यात आली आहे. ठाणे जिल्‘ात वसई येथे १00 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. नागपूर जिल्‘ातील डागा स्मृती स्त्री रुग्णालयातील खाटांची संख्या ३00 वरून ५00 पर्यंत वाढविण्यास मान्यता मिळाली.