शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

रात्रीच्या वेळी पोस्टमार्टम सुरू करणार

By admin | Updated: July 28, 2016 04:31 IST

सरकारी रुग्णालयात रात्रीच्यावेळी पोस्टमार्टम सुरू करण्याबाबत येत्या १५ दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तसेच राज्यातील वैद्यकीय सेवेतील रिक्त पदे भरण्याकरिता जिल्हा

मुंबई : सरकारी रुग्णालयात रात्रीच्यावेळी पोस्टमार्टम सुरू करण्याबाबत येत्या १५ दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तसेच राज्यातील वैद्यकीय सेवेतील रिक्त पदे भरण्याकरिता जिल्हा रुग्णालयाशी जोडून वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात येतील, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी विधानसभेत केली.सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी नियम २९३ अन्वये आरोग्य व जलसंधारण खात्याबाबत चर्चेचा प्रस्ताव दिला होता. त्या चर्चेला उत्तर देताना डॉ. सावंत म्हणाले की, सरकारी रुग्णालयांमधील रिक्त पदे हाच चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. राज्यातील वेगवेगळ््या ५३७ रुग्णालयांमध्ये ३२ हजार ८०० खाटा असून १४ वेगवेगळ््या वैद्यकीय सेवा या रुग्णालयांमधून पुरवल्या जातात. सध्या सरकारी १७ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. मात्र त्यामधून बाहेर पडणारे डॉक्टर व डॉक्टरांची गरज याचे प्रमाण व्यस्त आहे. राज्यात २६ खासगी वैद्यकीय महाविद्यालये असून त्यामधून शिक्षण घेणाऱ्यांची सरकारी रुग्णालयात सेवा बजावण्याची इच्छा नाही. त्यामुळे डोंगरी व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची वेगळी गुणवत्ता यादी तयार करून १० टक्के जागा त्याच भागात वैद्यकीय सेवा पुरवण्याकरिता राखून ठेवण्याचा प्रस्ताव आहे. केंद्रीय मंत्र्यांकडेही हीच भूमिका मांडल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा रुग्णालयाशी जोडून वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले तर डॉक्टरांची कमतरता कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.रात्रीच्यावेळी पोस्टमार्टम न करण्याची कायद्यातील तरतूद ही ब्रिटीशकालीन असून ती बदलण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्याचा संदर्भ देत डॉ. सावंत यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)