शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

१४ जूनपासून आॅनलाइन पदवी प्रवेशाला सुरुवात

By admin | Updated: June 13, 2016 03:02 IST

पदवीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला १४ जूनपासून सुरुवात होणार आहे.

नवी मुंबई : करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदवीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला १४ जूनपासून सुरुवात होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी सक्तीची असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून विद्यापीठाने कला, वाणिज्य आणि विज्ञान (अनुदानित आणि विनाअनुदानित ) या विद्याशाखांतील अभ्यासक्र मांसाठी प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे तिन्ही विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. या प्रवेश प्रक्रि येसंबंधीची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर १२ जून रोजी उपलब्ध करु न देण्यात येणार आहे. कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा, कोणती शाखा निवडावी याची चर्चा आजूबाजूला पहायला मिळत असून सीईटीमध्ये समाधानकारक गुण न मिळालेले विद्यार्थीदेखील पदवीसाठी प्रवेश घेणार आहेत. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेकडे यंदा विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. नीटच्या घोळामुळे ऐनवेळी विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या गोंधळामुळे मेडिकलकडे वळू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनीही पदवी अभ्यासक्रमाची निवड केल्याचे चित्र पहायला मिळते. बारावीचा निकाल पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची कटआॅफ काही टक्क्यांनी घसरणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार यंदा छायांकित प्रती आणि गुणपडताळणीकडेही विद्यार्थ्यांचा कल दिसून येत असून पुनर्मूल्यांकनासाठीही मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. एक-एक गुणांसाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची स्पर्धा पहायला मिळते. गुणवत्ता यादीनंतर लगेचच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत पदवी महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. >आॅनलाइन प्रवेशाचे वेळापत्रकअर्ज विक्र ी : २६ मे ते १४ जूनप्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी प्रक्रि या : १४ जून ते २१ जूनइन हाऊस अ‍ॅडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश : ७ ते २१ जूनफॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख : १८ ते २१ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)पहिली गुणवत्ता यादी : २२ जून (सायंकाळी ६ वाजता)कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा : २३ व २४ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)दुसरी गुणवत्ता यादी : २४ जून (सायंकाळी ६ वा.)कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा : २५ व २६ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)तिसरी गुणवत्ता यादी : २६ जून (सायंकाळी ६ वा.)कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा : २७ व २८ जून (दुपारी ३)