मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावी, बारावीची आॅक्टोबर परीक्षा २६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास त्यांच्यासाठी मंडळाने समुपदेशन व हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून हेल्पलाइन सुरू होणार असून, ती २0 आॅक्टोबरपर्यंत उपलब्ध असणार आहे.मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावी बारावीची आॅक्टोबर परीक्षा २६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बारावी परीक्षा २६ सप्टेंबर ते २0 आॅक्टोबर आणि दहावीची परीक्षा २६ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. विधानसभा निवडणूक मतदानामुळे १५ आॅक्टोबर रोजी होणारा बारावीची शिक्षणशास्त्र व इंग्रजी साहित्य या विषयांची लेखी परीक्षा २0 आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)
शुक्रवारपासून दहावी- बारावीची परीक्षा सुरू
By admin | Updated: September 23, 2014 05:18 IST