शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात

By admin | Updated: August 7, 2016 21:14 IST

अकरावी प्रवेशानंतरही महाविद्यालय किंवा शाखा बदल करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने विशेष आॅनलाईन फेरीचे आयोजन केले

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 7-  अकरावीला दूरचे महाविद्यालय मिळाले आहे किंवा शाखा बदल करायचा आहे; अशा विविध कारणांमुळे अकरावी प्रवेशानंतरही महाविद्यालय किंवा शाखा बदल करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने विशेष आॅनलाईन फेरीचे आयोजन केले आहे. त्यासाठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करून आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सोमवारी, ८ आॅगस्टपासून सुरुवात होत आहे.याआधी मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीच्या २ लाख ६९ हजार ७७२ जागांसाठी घेण्यात आलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत चार गुणवत्ता यादी जाहीर झाल्या. त्यातून एकूण १ लाख ५३ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश घेतला. या यादीमध्ये नाव आल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही, अशा ७० हजार नॉट रिपोर्टेडविद्यार्थ्यांपैकी ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना उपसंचालक कार्यालयाने मेसेजद्वारे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांपैकी केवळ ११ हजार ८३० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला होता.या सर्व प्रक्रियेत अर्ज न भरल्याने किंवा अर्धवट अर्ज भरल्याने प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात शुक्रवार आणि शनिवारी सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे उपसंचालक कार्यालयाने सांगितले.म्हणजेच आत्तापर्यंत सुमारे १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी प्रवेश घेतला आहे. याउलट रिक्त जागांची संख्या एक लाखाच्या घरात गेली आहे. परिणामी घरापासून दूरच्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या, चुकीच्या शाखेत प्रवेश घेतलेल्या, चुकीचा विषय निवडलेल्या आणि अद्याप प्रवेशापासून वंचित असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना या रिक्त जागांवर प्रवेश मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे....................४० मार्गदर्शन केंद्रांचा आधारविशेष फेरीसाठी सोमवार व मंगळवारी आॅनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज व पसंतीक्रम अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी उपसंचालक कार्यालयाने ४० मार्गदर्शन केंद्र पुन्हा एकदा सुरू केली आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याला (अकरावीला प्रवेश घेतलेल्या किंवा आत्तापर्यंत प्रवेश न घेतलेल्या) प्रवेश अर्ज आणि पसंतीक्रम अर्ज भरता येईल. पसंतीक्रम अर्ज भरताना किमान १० किंवा कमाल १५ महाविद्यालयांची निवड बंधनकारक आहे. अर्ज करताना याआधी अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेश रद्द करण्याची गरज नाही. विशेष फेरीत आवडते महाविद्यालय मिळाल्यानंतरच आधीचा प्रवेश रद्द करण्याची खबरदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणतीही अडचण असल्यास मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे.