शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

डीपी रस्त्याचे काम सुरू करा; अन्यथा आंदोलन

By admin | Updated: May 17, 2016 01:55 IST

वाहनांची वाढती संख्या व त्यातुलनेत अपुरा पडणारा रस्ता यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी वाढतच चालली आहे.

पुणे : वाहनांची वाढती संख्या व त्यातुलनेत अपुरा पडणारा रस्ता यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी वाढतच चालली आहे. त्याला पर्याय म्हणून महापालिकेने नदीपात्रातून सुरू केलेल्या रस्त्याचे काम न्यायालयाच्या निर्णयामुळे थांबवावे लागले; मात्र त्यानंतर प्रशासनाने या रस्त्यावरच्या वाहतूककोंडीकडे पूर्ण दुर्लक्षच केले आहे, असा आरोप करीत शिवसेनेने ही कोंडी फोडण्यासाठी विकास आराखड्यातील साडेसात किलोमीटर रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून नदीपात्रातून रस्ता तयार करण्यात येत होता; मात्र काही पर्यावरणप्रेमींनी त्याला हरकत घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली. याचा निर्णय पालिकेच्या विरोधात लागला व केलेला रस्ता उखडण्याची नामुष्की पालिकेवर आली. त्यामुळे नंतर सिंहगड रस्त्यावर रोज होणाऱ्या वाहतूककोंडीकडे पूर्ण दुर्लक्षच झाले असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी सांगितले.ही कोंडी फोडण्याचा दुसरा पर्याय शिवसेनेने दिला आहे. वडगाव बुद्रुक येथील फन टाइम चित्रपटगृह ते पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंत व तेथून थेट पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंद पाईपलाईनच्या बाजूने सुमारे साडेसात किलोमीटर रस्ता विकास आराखड्यात दाखविण्यात आला आहे. महापालिकेने या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी करणारे निवेदन निम्हण तसेच शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, माजी नगरसेवक श्याम देशपांडे, संदीप मोरे, गजानन थरकुडे आदींनी आयुक्त कुणाल कुमार तसेच पथ विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांना दिले आहे. काम सुरू झाले नाही तर आंदोलन सुरू करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. विभागप्रमुख भरत कुंभारकर, विभाग उपप्रमुख मनीष जगदाळे, महेश पोकळे, मंगेश पायगुडे, अनिकेत देशमुख, संग्राम गायकवाड, संतोष सांवत, अनिल कदम, राहुल गिराम, अमित सांळुके, सुनीता खंडाळकर, संध्या खडके, जयश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वडगाव बुद्रुक येथील फन टाइम चित्रपटगृह ते पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंत व तेथून थेट पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंद पाईपलाईनच्या बाजूने सुमारे साडेसात किलोमीटर रस्ता विकास आराखड्यात दाखविण्यात आला आहे. सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून नदीपात्रातून रस्ता तयार करण्यात येत होता; मात्र काही पर्यावरणप्रेमींनी त्याला हरकत घेत न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाचा निर्णय पालिकेच्या विरोधात लागला व केलेला रस्ता उखडण्याची नामुष्की पालिकेवर आली.