शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीच्या पर्यायांचा अभ्यास सुरू

By admin | Updated: December 2, 2014 00:41 IST

आमच्या जाहीरनाम्यात प्रिटिंग मिस्टेक होणार नाही. एलबीटी रद्द करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. एलबीटी रद्द केल्यानंतर २५ महापालिकांचे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी काय

मुनगंटीवार यांची स्पष्टोक्ती : दोन बैठका झाल्यानागपूर : आमच्या जाहीरनाम्यात प्रिटिंग मिस्टेक होणार नाही. एलबीटी रद्द करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. एलबीटी रद्द केल्यानंतर २५ महापालिकांचे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी काय उपाय योजता येतील याबाबतच्या पर्यायांवर सरकारने अभ्यास सुरू केला आहे, असा खुलासा वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी ‘लोकमत भवन’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. मुनगंटीवार म्हणाले, एलबीटीबाबत सरकारच्या दोन बैठका झाल्या आहेत. एलबीटी रद्द करून नवीन करप्रणाली लागू करताना आधी व्यापाऱ्यांचीही संमती घ्यावी लागेल. नाहीतर प्रश्न अधिक किचकट होईल. त्यामुळे सरकार तीन मुद्यांवर चाचपणी करीत आहे. टर्नओव्हर टॅक्स लावता येईल का, मुद्रांक शुल्कात वाढ करता येईल का किंवा व्यापाऱ्यांनी सुचविल्याप्रमाणे व्हॅटवर सरर्चाज लावता येईल का, या पर्यायांवर अभ्यास सुरू आहे. एलबीटी रद्द केला तर राज्यातील २५ महापालिकांचे १४ हजार ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडणार आहे. या उत्पन्नाची भरपाई करावी लागेल. त्यामुळे जीएसटीचा निर्णय पाहून लवकरच या एलबीटी रद्दची घोषणा केली जाईल व यापैकी एका पर्यायाची निवड केली जाईल. टर्नओव्हर टॅक्स सर्वांवर आकारणे एकाअर्थी चुकीचे ठरेल. शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उभारण्याकरिता ग्रामीण भागातील नागरिकांवर कर आकारणे योग्य होणार नाही. व्हॅटवर अधिभार लावण्याचा विषयही तसाच आहे. नागपूर, अमरावती, चंद्रपूर शहराच्या विकासासाठी ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी व्हॅटवर अधिभार का भरायचा, असा प्रश्न निर्माण होईल. याला ग्रामीण भागातील नागरिकांकडून विरोध होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. (प्रतिनिधी)कलम ५२ च्या निर्णयावर अवलंबून केंद्र सरकारकडून जीएसटीचा अंतिम मसुदा याच महिन्यात सादर केला जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत केंद्राने दिले आहे. कलम ५२ अंतर्गत महापालिकांना कर गोळा करण्याचा अधिकार दिला आहे. संबंधित कलम जीएसटीच्या मसुद्यात रद्द केले जाते की कायम राहते याची राज्य सरकार वाट पाहत आहे. संबंधित कलम रद्द केले तर पुढील तीन वर्षांऐवजी १० वर्षे महापालिकांना भरपाई देण्याची मागणी केंद्राकडे केली जाईल व रद्द न झाल्यास वर्षभरासाठी एखादी छोटी कर प्रणाली विकसित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दोन व्यापाऱ्यांवर एलबीटी धाडनागपूर : महापालिकेच्या एलबीटी विभागाने एलबीटी (स्थानिक संस्था कर) न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर धाडसत्र सुरू केले आहे. विभागाने सोमवारी शहरातील बांधकाम साहित्य व्यवसायी व सुपर ड्रिंक्स वितरकाचे दस्तऐवज सील करून कारवाई केली. संबंधितांकडून दंडासह एलबीटी वसूल केला जाणार आहे. हमीद रहीम बेग यांचे फिरदोस कॉलनी रुख्मिणीनगर येथे बेग स्टील या नावाने प्रतिष्ठान आहे. ते १९९८ पासून बांधकाम साहित्य विकण्याचा व्यवसाय करतात. एलबीटी विभागाने सोमवारी त्यांचे कागदपत्र सील करून तपासणी केली असता त्यांनी २०१३-१४ मध्ये ७ लाख १ हजार ४०९ रुपयांचा व २०१४-१५ मध्ये २० लाख ५५ हजार ४६५ रुपयांचे स्टील आयात केल्याचे दिसून आले. डीलरने महापालिकेकडे एलबीटीची नोंदणी केलेली नाही व खरेदी रजिस्टरमध्येही नोंद केलेली नाही. त्यामुळे त्यांची कागदपत्रे सील करण्यात आली. आता विभागातर्फे कारवाई करीत नियमानुसार दंडासह एलबीटी आकारला जाईल. नरेंद सिंग यांच्या मालकीचे सुपर ड्रिंक्स प्रा.लि.मध्येही एलबीटी विभागाने तपासणी केली. संबंधित डीलरने व्हॅटमध्ये नोंदणी केलेली आहे. त्यामुळे त्यांची एलबीटीअंतर्गतही नोंदणी झाल्याचे गृहित आहे. एलबीटी लागू झाल्यानंतर डीलरने ३.३४ कोटी रुपयांचा माल आयात केला. त्यानुसार त्यांनी १६ लाख ७१ हजार रुपये एलबीटी भरणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी ६ लाख ९७ हजार रुपयेच भरले. तपासणीत खरेदी रजिस्टरमध्ये नियमित नोंदी नसल्याचे व २०१३-१४ चे एलबीटी रिटर्न फाईल न केल्याचे दिसून आले. त्यामुळे विभागाने आवश्यक तपासणीसाठी कागदपत्रे सील केली. कागदपत्रांच्या तपासणीनंतर विभागातर्फे आवश्यक ती कारवाई केली जाईल. सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली एलबीटी अधिकारी यादव जांभूळकर, सहायक अधिकारी संजय मेंडुले, सुमेर गजभिये, सुरेश धुपे, विलास चहांदे, रमेश पढ्ढान, दत्तराज वानखेडे, अमीर हुसेन, शिवप्रसाद यादव, जगेश्वर वानखेडे आदींनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)