शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पाच्या मूर्ती बनविण्यास प्रारंभ

By admin | Updated: June 29, 2014 23:17 IST

कोकणात गणरायाची सुबक मूर्ती तयार करण्यासाठी हजारो हात सरसावतात ते वटपौर्णिमेनंतरच.

मुरुड : कोकणात गणरायाची सुबक मूर्ती तयार करण्यासाठी हजारो हात सरसावतात ते वटपौर्णिमेनंतरच. कारखान्यात अलिकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या फ्रेममध्ये o्रींच्या मूर्ती साकारल्या जात असल्या तरी कोकणात अद्याप गणोश भक्तांची पसंती शाडूच्या मातीपासून तयार होणा:या मूर्तीनाच सर्वाधिक  असते. मूर्तिकलेच्या आड लौकिक अर्थाने शिक्षण, प्रशिक्षण अजिबात येत नाही. साजि:या मूर्ती हातावेगळय़ा करण्यासाठी हवी असते ती चिकाटी, सातत्य आणि कष्ट उपसण्याची तयारी.
मुरुड तालुक्यातील वाणदे या छोटय़ाशा गावात प्रसिद्ध मूर्तीकार पांडुरंग विठोबा पाटील यांचे जेमतेम दुसरीर्पयत शिक्षण झालेले असून वयाच्या 16 व्या वर्षापासून या कलेकडे ते वळले. अत्यंत हालाखीची परिस्थिती, चार पैसे मिळवून कुटुंबाला हातभार लावावा म्हणून मुरुड गाठले. सुप्रसिद्ध मूर्तीकार कै. वसंत जंजिरकर यांचे शिष्य. दहा वष्रे या कामातील बारकावे आत्मसात केले. त्यानंतर वाणदे या जन्मगावी स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली. सलग 4क् वर्षे ते मूर्तीकाम करीत आहेत. मध्यंतरी लक व्याचा त्रस झाला परंतु  जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर मुलगा प्रसादच्या मदतीने हा व्यवसाय अव्याहत सुरू आहे.  दरवर्षी सुमारे 5क्क् गणोशमूर्ती कारखान्यात ते तयार करतात. रोहा, इंदापूर, तळा या तालुक्यात त्यांनी तयार केलेल्या मूर्तीला विशेष मागणी असते. तीनशे रुपयांपासून दहा हजारांर्पयत o्रींची मूर्ती उपलब्ध केली जाते. नांदगावच्या सिद्धीविनायकच्या 12 बाय 19 इंचाच्या देखण्या मूर्तीना विशेष मागणी असते. 
या व्यवसायामध्ये चार पैसे मिळतात परंतु त्याहीपेक्षा विघAहत्र्याची सेवा महत्त्वाची असल्याचे ते विनम्रपणो सांगतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये मूर्तीकाम सुबक आकर्षक होते तरीही पर्यावरणाला कुठेही तडा जाऊ नये म्हणून शाडू मातीतूनच मूर्तीकाम करण्यासाठी पाटील आग्रही राहतात. (वार्ताहर)
 
दरवर्षी कच्च्या मालाच्या किमती 15 ते 2क् टक्क्यांनी वाढतात. 4क् किलो शाडू मातीसाठी 17क् रुपये मोजावे लागतात. शिवाय रंगाचे दर सातत्याने वाढतात. कुशल कामगारांची खूप कमतरता आहे. कारखान्यासाठी स्वत:चे घर व अन्य जागा भाडय़ाने घ्यावी लागते. वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे कामामध्ये व्यत्यय येतो. ज्यांना शिकण्याची हौस आहे तसेच ओल्या मातीत काम करावयाचे आहे अशी मंडळी मोजकीच असते. नव्या पिढीतील युवकांना मूर्तीकामात विशेष रस दिसत नसल्याची त्यांची खंत आहे.