शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

अंबाबरवा गाव खाली करण्यास प्रारंभ

By admin | Updated: May 5, 2016 03:24 IST

वाघ वाचविण्याच्या मोहीमेतील पहिले पाऊल; गाव व शेतांच्या जागी होणार गवती कुरण.

बुलडाणा: महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगतच्या बुलडाणा व अकोला जिल्ह्यामध्ये पसरलेल्या अंबाबरवा अभयारण्यातील अंबाबरवा हे गाव पंधरा दिवसात उठणार असून, त्याची सुरूवात मंगळवारी संध्याकाळी झाली. या गावातील २९८ ग्रामस्थांना वन विभागाच्या वतिने पुनवर्सन मोबदल्याचे वाटप मंगळवारी करण्यात आले असून, अनेक कुटूंबांनी बुधवारपासून गाव सोडण्यास सुरूवातही केली आहे. हे गाव पूर्ण खाली झाले, की येथे वन्यप्राण्यांचा राबता व्हावा, यासाठी कुरण तयार केले जाणार असल्याची माहिती वन्यजिव विभागाने दिली.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा कॉरिडोर असलेल्या या अभयारण्यातील अंबाबरवा या गावाच्या पूनर्वसनास प्राधान्य देण्यात आले असून, पुढील टप्यात रोहीणखेड हे गाव उठविले जाणार आहे. मंगळवारी संध्याकाळी वन्यजिव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा, जिल्हा परिषद सदस्य डॉ.वासुदेवराव गावंडे, संग्रामपुर पंचायत समितीचे सभापती पांडूरंग हागे, भाजपाचे तालुका अध्यक्ष दशरथ सुरडकर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्रश्नांचे अभ्यासक यादव तरटे यांच्या उपस्थितीत पुनवर्सनाच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान, येथील सामाजिक कार्यकर्त्या उषा भालेराव या केंद्रीय पर्यावरण समितीच्या सदस्या असताना, त्यांनी अंबाबरवा अभयारण्याचा प्रश्न केंद्र स्तरावर नेला होता. तत्कालीन केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्याकडे अंबाबरवा अभयारण्य घोषित करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. सध्या होत असलेले अंबाबरवा गावाचे पुनवर्सन योग्य असून, यामुळे वाघ वाचविण्याच्या मोहीमेत मोठे यश मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला .सव्वा कोटीचे रोख वितरण अंबाबरवा गावातील २९८ ग्रामस्थ पुनवर्सनाच्या यादीत असून, त्यापैकी १४५ ग्रामस्थांना प्रत्येकी ८0 हजार याप्रमाणे रोख रकमेचे वाटप मंगळवारी करण्यात आले. ही रक्कम देताना पती-पत्नीची स्वाक्षरी घेण्यात आली आहे. पुनर्वसनाची उर्वरित रक्कम ही प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये टाकली जाणार असून, त्यासाठी मंगळवारीच २९८ ग्रामस्थांचे बँक खाते अंबाबरवा या गावात जाऊनच उघडण्यात आले.आदीवासींची पसंती मध्यप्रदेशलाअंबाबरवा या गावात राठीया, भिलाला, पावरा, बारेला, भील्ल, कोरकू, न्याहाल या जमातीमध्ये मोडणारे आदीवासीं वास्तव्याला आहेत. त्यापैकी काहींनी सहा महिन्याअगोदरच मध्यप्रदेशामध्ये आसरा घेतला आहे. त्यापाठोपाठ येथील आदिवासी बांधव मध्यप्रदेशात जात आहेत. विशेष म्हणजे या आदीवासींना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाराष्ट्रात मोठी अडचण होती, ती मध्यप्रदेशात राहणार नाही. त्यामुळे पुनवर्सन प्रमाणपत्रासोबतच अंबाबरवाचे आदीवासी आता मध्यप्रदेशचे रहिवासी होणार आहेत.