शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत कॉर्पोरेट एक्सीलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्याला सुरुवात

By admin | Updated: February 25, 2017 20:13 IST

अर्थकारणातून समाजकारण आणि शिक्षणापासून जनकल्याणापर्यंत झटणाऱ्या राज्यभरातील दिग्ग्जांच्या यशस्वी कारकिर्दीची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - अर्थकारणातून समाजकारण आणि शिक्षणापासून जनकल्याणापर्यंत झटणाऱ्या राज्यभरातील दिग्ग्जांच्या यशस्वी कारकिर्दीची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडंट हॉटेलमध्ये ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सीलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्याला सुरुवात झाली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे.
 
‘लोकमत समूहा’कडून तळागाळात काम करणाऱ्यांसह उद्योगापासून कॉर्पोरेटपर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या यशस्वी दिग्गजांना गौरवण्यात येते. राष्ट्रीय स्वरूप असलेल्या ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सीलन्स अ‍ॅवॉर्ड’चे यंदा तिसरे वर्ष आहे. या गौरव सोहळ्याला राजकीय क्षेत्रासह कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, हॉटेल उद्योजक विठ्ठल व्यंकटेश कामत यांच्यासह ‘लोकमत समूहा’चे अध्यक्ष विजय दर्डा या मान्यवरांची ‘लोकमत गौरव पुरस्कार’ सोहळ्याला उपस्थिती असणार आहे.
आऊटडोअर मीडिया, रिटेल, फॅशन, उद्योग, परवडणारी घरे, दंतचिकित्सा, नेतृत्वशाली महिला, गुणवत्तापूर्ण शिक्षण, विपणन, ग्राहक सेवा, शाश्वत नेतृत्वशैली, बांधणी आणि संरचना, औषध निर्मिती आणि विपणन, तंत्रज्ञान, दुग्धउत्पादन, पर्यावरणपूरक विकास, अतिथी आदरातिथ्य, आरोग्य सेवा, आयुर्वेद आणि पर्यावरणपूरक प्रकल्प या क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सिलन्स अ‍ॅवॉर्ड’ने गौरवण्यात येणार आहे. ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सीलन्स अ‍ॅवॉर्ड’चे टायटल स्पॉन्सर थारवानी ग्रुप असून, रिजन्सी ग्रुप ‘पॉवर्ड बाय’ आहेत.