शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीतील गुरूपौर्णिमा उत्सवाला आरंभ

By admin | Updated: July 18, 2016 20:02 IST

पहाटे काकड आरतीनंतर साईप्रतिमा,साईसच्चरित्र ग्रंथ व विणा मिरवणुकीने तीन दिवस चालणाऱ्या साईनगरीतील शतकोत्तरी गुरूपौर्णिमा उत्सवाचा आज श्रीगणेशा झाला.

ऑनलाइन लोकमत

शिर्डी, दि. १८ - पहाटे काकड आरतीनंतर साईप्रतिमा,साईसच्चरित्र ग्रंथ व विणा मिरवणुकीने तीन दिवस चालणाऱ्या साईनगरीतील शतकोत्तरी गुरूपौर्णिमा उत्सवाचा आज श्रीगणेशा झाला.पहाटे साईसमाधी मंदीरातुन ही मिरवणुक द्वारकामाई मंदीरात आली़ यावेळी कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी साईसच्चरित्र ग्रंथ, उपकार्यकारी अधिकारी डॉ़ संदीप आहेर व मंदीर प्रमुख राजेंद्र जगताप यांनी प्रतिमा तर मंदीर पुरोहित विलास जोशी यांनी विणा घेतला होता़ या मिरवणुकीनंतर द्वारकामाई मंदीरात अखंड साईसच्चरित्राचे पारायणाचा शुभारंभ झाला़ उद्या पहाटे या पारायणाची सांगता होणार आहे़ कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे व सिमा शिंदे यांनी प्रथम तर उपकार्यकारी अधिकारी संदीप आहेर यांनी द्वितीय अध्यायाचे वाचन करून या उपक्रमाची सुरवात केली़सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत ह.भं प़ माधवराव आजेगावकर यांचे किर्तन झाले़ साडेसात वाजता  के़स्वर्णश्री ,विजयवाडा यांचा कुचिपूडी नाट्य व साईभक्ती संगीत, रात्री नऊ वाजता पे्रमानंद कृष्णा कोचरेकर, गोवा यांचा गोमंतकालीन वैशिष्ठ्यपुर्ण घुमटावरील आरत्या हा कार्यक्रम समाधी मंदीरा शेजारील स्टेजवर संपन्न होईल .रात्री सव्वा नऊ वाजता श्रींच्या पालखीची गावातुन मिरवणुक काढण्यात येईल गुरूपौर्णिमा उत्सवा निमीत्त बंगलोर येथील भाविक के़ सी़ सुब्रमणी यांच्या देणगीतुन मंदीर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे़ या शिवाय मुंबई येथील साईराज डेकोरेटर्स यांनी मंदीर व परिसरात नयनरम्य विद्युत रोषणाई केली आहे़ हैद्राबादच्या साईभक्ताच्या देणगीतुन आज संस्थान प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात आले़.उद्या ,मंगळवार उत्सवाचा मुख्य दिवस असुन रात्री सव्वा नऊ वाजता शहरातुन रथ मिरवणुक काढण्यात येणार आहे़ तसेच मंदीर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे़.