शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

खटला सुरू करा

By admin | Updated: April 11, 2017 01:20 IST

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी माझ्यावर दोषारोपपत्र दाखल असलेला खटला लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी डॉ. वीरेंद्र तावडे याने सोमवारी

कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी माझ्यावर दोषारोपपत्र दाखल असलेला खटला लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी डॉ. वीरेंद्र तावडे याने सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात केली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर ही सुनावणी झाली. पुण्यातील येरवडा कारागृहातील डॉ. तावडे याच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी संवाद साधला. यावेळी त्याचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन उपस्थित होते. पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ‘सनातन’चा साधक संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याला एसआयटीच्या पथकाने २ सप्टेंबर २०१६ रोजी ‘सीबीआय’कडून ताब्यात घेऊन त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर तो पुण्याच्या येरवडा कारागृहात ‘सीबीआय’च्या ताब्यात आहे.न्यायाधीश बिले यांनी, व्हिडिओ कॉन्फरन्सवर दिसणाऱ्या व्यक्तीची, ‘डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे तुम्हीच का?’ अशी ओळख परेड घेतली. तुम्हाला प्रशासकीय अडचणींमुळे न्यायालयात हजर करता आले नसल्याचेही न्यायाधीशांनी त्याला सांगितले. तुमच्यावर आरोप निश्चितीबाबत सुनावणीला उच्च न्यायालयाने ५ जुलैपर्यंत स्थगिती दिल्याचे सांगितले तरीही तुमच्याशी बोलावे म्हणून ‘व्ही.सी.’द्वारे समोरासमोर आहे. तुमचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन येथे असून तुम्हाला खटल्याबाबत काय सांगायचे आहे का? असेही विचारले. त्यावेळी डॉ. तावडे याने हा खटला लवकरात लवकर सुरू करा, अशी विनंती न्यायाधीशांकडे केली. (प्रतिनिधी)२० एप्रिलला उच्च न्यायालयात अहवाल पानसरे हत्याप्रकरणी तपासातील प्रगतीचा अहवाल एसआयटीमार्फत (विशेष पथक) २० एप्रिलला उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्यातील तपासातील प्रगतीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करणे ‘एसआयटी’ला बंधनकारक आहे.