शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘सैराट’ची तिकिटे न दिल्याने मारहाण

By admin | Updated: May 11, 2016 00:48 IST

दौंडमध्ये सैराट या चित्रपटाची तिकिटे न मिळाल्याने थिएटरमालकावर तलवारीने वार केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड : दौंडमध्ये सैराट या चित्रपटाची तिकिटे न मिळाल्याने थिएटरमालकावर तलवारीने वार केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलवारी घेऊन आलेल्या टोळक्याने थिएटरमालकाच्या ६६ वर्षीय आईचे केस ओढून त्यांना रस्त्यावर धक्काबुक्की केली असल्याची माहिती दौंड पोलीसांनी दिली. ही घटना शनिवारी (दि.७) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास सहकार चौक परिसरातील गणेश मिनी थिएटर येथे हा प्रकार घडला. रोहित रवींद्र कांबळे, विराज रवींद्र कांबळे व त्याचे इतर चार साथीदार सैराटचा शो सुरू असताना थिएटरमध्ये आले. थिएटरमालक श्रीनाथ कांबळे याने त्यांना शो सुरू झाल्याचे सांगत तिकिटे नसल्याचे सांगितले.दरम्यान, संबंधितांना श्रीनाथ याने त्यांना शो सुरू असतानाची गर्दी दाखविली; परंतु सिनेमाबघायचा असे सांगत ते तिकिटावर अडून राहिले. तिकीट न दिल्याच्या रागापोटी त्यांनी तलवारी आणून थिएटरच्या पुढील भागाची तोडफोड केली. श्रीनाथ कांबळे यास रस्त्यावर उभ्या असलेल्या मारुती व्हॅगनार या गाडीत टाकून डोके, छाती, कंबर व पाठीवर बेदम मारहाण केली. कांबळे यांची आई कौसल्या कांबळे या भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांना त्यांचे केस ओढून धक्काबुक्की करण्यात आली. सहा जणांनी जाताना तलवारी नाचवत थिएटरवर दगडफेक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. श्रीनाथ कांबळे याच्या डोक्यास व पायास गंभीर जखम झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कौसल्या नागनाथ कांबळे (रा. खाटीक गल्ली, दौंड) यांनी संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार सहा जणांविरुद्ध दंगल, मारहाण, नुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान विराज रवींद्र कांबळे याने थिएटरमालकाच्या विरोधात तक्रार दिली असून, थिएटरमालकाने थिएटरच्या आत सैराटचे शंभर रुपयांचे तिकीट पाचशे रुपयांना घ्यावे लागेल, असे सांगून थिएटरमालक श्रीनाथ कांबळे व त्याच्या इतर ३ साथीदारांनी आम्हाला मारहाण करून डाव्या हाताला फ्रॅक्चर केल्याची परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.