शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात एसटीला थांब्याचा विसर

By admin | Updated: June 6, 2016 03:25 IST

नियोजित थांब्यावर न थांबताच बस दुसऱ्या मार्गावरुन गेल्याने मुंबईला येणाऱ्या एका कुटुंबाला थांब्यावरच एसटी बसची तब्बल पाच तास वाट पाहावी लागल्याची विचित्र घटना साताऱ्यात घडली.

मुंबई : नियोजित थांब्यावर न थांबताच बस दुसऱ्या मार्गावरुन गेल्याने मुंबईला येणाऱ्या एका कुटुंबाला थांब्यावरच एसटी बसची तब्बल पाच तास वाट पाहावी लागल्याची विचित्र घटना साताऱ्यात घडली. या कुटुंबामध्ये एका वृद्ध महिलेसह त्यांची सून आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. याविरोधात या कुटुंबाने एसटी महामंडळाने लेखी तक्रार केली आहे. वरळी पोलीस कॅम्प वसाहतीत सावंत कुटुंबीय राहतात. सुट्टीनिमित्ताने सावंत कुटुंबातील पार्वती शंकर सावंत (६६), दीपा दत्तात्रय सावंत (३६), श्रेयश दत्तात्रय सावंत (१६), निमिशा दत्तात्रय सावंत (१३), साक्षी संजय कदम (१२) हे कराड येथे गेले होते. २ जून रोजी परत येण्यासाठी त्यांनी कराड - परेल या एसटीचे आॅनलाईन तिकीट आरक्षण केले. त्यानुसार दुपारी दोन वाजता कराड येथून ही एसटी सुटणार होती. सावंत कुटूंबिय वेळेच्या अर्धा तास आधीच तेथील अतीत या बस थांब्यावर दाखल झाले. मात्र बराच वेळ होऊनही एसटी न आल्याने त्यांनी जवळील चौकशी कक्षात विचारणा केली. मात्र तेथूनही काहीही माहिती मिळाली नाही. भर उन्हात वृद्ध सासू आणि मुलांना घेऊन कसे जायचे या विचारात दिपा यांनी एसटी विभागाकडे धाव घेतली. वरळी पोलीस ठाण्यात क्राईम पीआय असलेले पती दत्तात्रय सावंत यांना दीपा यांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर दत्तात्रय यांनी दूरध्वनी करण्यास सुरुवात केली. कराड एसटी स्टॅण्डच्या क्रमांकावर वारंवार दूरध्वनी केले. मात्र तेथूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सातारा येथील एसटी स्टॅण्डवरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बराच वेळ फोन वाजूनही कोणीही प्रतिसाद दिला नसल्याचे सावंत कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर सायंकाळी साडे ॉचारच्या सुमारास सातारा येथील एसटी स्टॅण्डवर झालेल्या संपर्कात, कराड - परेल एसटी सातारा येथून निघून गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या संतापाबरोबर चिंतेत आणखीन भर पडली. अखेर अतीत एसटी थांब्यातील प्रमुख अवघडे यांनी सावंत कुटुंबाला सुरळीत दुसऱ्या बसने पोहचविण्याचे आश्वासन दिले. सायंकाळी सातच्या सातारा- मुंबई मेगा हायवे गाडीमध्ये अतिरिक्त पैसे भरुन त्यांना परतीचा प्रवास करावा लागला. याविरोधात एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांकडे तक्रार करण्यात आली असून त्यावर अद्यापही कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सावंत कुटुंबाने केली आहे.