शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्याचा स्थायी समितीला झटका

By admin | Updated: October 19, 2016 04:09 IST

कर्मचाऱ्यांवर मेहरनजर करणारा स्थायी समितीचे ठराव राज्याच्या नगरविकास खात्याने निलंबित करून शिवसेनेला मोठा झटका दिला

अजित मांडके,

ठाणे- अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात दिरंगाई करणाऱ्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांसह लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांवर मेहरनजर करणारा स्थायी समितीचे ठराव राज्याच्या नगरविकास खात्याने निलंबित करून शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांवर पुढील कारवाई करण्यास आयुक्त मोकळे झाले आहेत.ठाणे शहरास अनधिकृत बांधकामाचे आगर म्हणून ओळखले जाते. राज्यातील सर्वात जास्त अनधिकृत बांधकामे ठाण्यात आहेत. अशाच एका प्रकरणात ठाणे महापालिकेच्या माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त मंगल शिंदे, सुनील पाटील, लिपीक व देवीदास भोईर (क वर्ग लिपीक) यांना प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले होते. परंतु, त्याकडे त्यांनीदुर्लक्ष केल्याने तत्कालीन आयुक्तांनी ३० मे २००८ पासून त्यांनासेवेतून निलंबित केले होते. विशेष म्हणजे याप्रकरणी केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार या प्रकरणी संबधींतांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ८ अन्वये विभागीय चौकशी प्रक्रिया पूर्ण केली होती.दरम्यान पालिका प्रशासनाने एकाच वेळी दोन शिक्षा सुनावल्याने त्या अन्यायकारक असल्याचे मत तत्कालीन स्थायी समितीने व्यक्त केले होते. त्यामुळे एक वार्षिक वेतनवाढ पुढील वेतन वाढीवर परिणाम न करता रोखणे ही शिक्षा पुरेशी आहे. मात्र, प्रशासनाने सुनावलेली दुसरी शिक्षा ते निलंबन कालावधी हा सेवा कालावधी धरावा असा ठराव पारीत केला होता. परंतु, हा ठराव विखंडित करावा यासाठी १६ मार्च २०१६ रोजी महापालिका आयुक्तांनी शासनाकडे विनंती केली होती. त्यानुसार शासनाने स्थायी समितीने केलेला ठराव हा लोकहित व ठाणे महापालिकेच्या हिताच्या विरोधात असल्याचे नमूद करुन निलंबित केला आहे. मुख्यमंत्र्याकडीलनगरविकास विभागाने हा निर्णय घेवून ठाणे महापालिाकेतील सत्ताधारी शिवसेनेला मोठा झटका दिला असून शहरातील अनधिकृत बांधकामांना शिवसेना पाठिशी घालत असली तरी सरकार यातील दोषींना पाठिशी घालणार नाही, असा संदेश देऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुरघोडी केली आहे. >जबाबदारी टाळलीसहाय्यक आयुक्त मंगल शिंदे यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई टाळल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यानुसार त्यांच्यावर ठपका ठेवून सुनील पाटील (लिपीक) सुभाष भोईर (क वर्ग लिपीक) यांच्यावर ठेवण्यात आलेला एक दोषरोप अंशत: सिद्ध झाल्याने दोन्ही कर्मचाऱ्यांची ठाणे महापालिकेच्या कार्यालयीन आदेशानुसार एक वार्षिक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम करुन रोखली व त्यांचा निलंबन कालावधी हा निलंबन कालावधी म्हणून धरला. तसेच निवृत्त वेतन प्रयोजनार्थ हा कालावधी अर्हताकारी सेवा कालावधी म्हणून धरावा, असे सुचविले होते.