शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीसाठी दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच

By admin | Updated: March 5, 2016 00:52 IST

स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

पुणे : स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. महापालिकेतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना साकडे घातले. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही स्थायीचे अध्यक्षपद कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडेच राहावे, असा आग्रह पवार यांच्याकडे धरला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होणार, याचा फैसला अखेर शनिवारी सकाळी स्थायीच्या बैठकीत होणार असून त्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब बोडके, काँग्रेसकडून अविनाश बागवे, तर भाजपाकडून राजेंद्र शिळीमकर या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ६, काँग्रेस, मनसे व भाजपाचे प्रत्येकी ३, तर शिवसेनेचे २ असे बलाबल आहे. राष्ट्रवादीला अध्यक्षपदी उमेदवार निवडून आणण्यासाठी किमान एका पक्षाचा पाठिंबा मिळवावाच लागणार आहे. आघाडीमध्ये बिघाडी झाल्यास अध्यक्षपदासाठी मनसेची मदत घेण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठेवण्यात आली आहे. नाशिक महापालिकेमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मनसेलाही राष्ट्रवादीची मदत लागणार असल्याने त्याबदल्यात पुण्यात मदत करण्याच्या समीकरणावर विचार केला जात आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून जो निरोप येईल, त्यानुसार मनसेकडून मतदान केले जाणार असल्याचे मनसेचे गटनेते बाबू वागस्कर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी कायम ठेवण्याचा आग्रह धरला आहे. दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर अडून राहिल्यास मनसे किंवा शिवसेनेची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.