शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चोरट्यांचा रेल्वे प्रवाशावर लाठीहल्ला

By admin | Updated: June 23, 2016 00:56 IST

आकोट फैल रेल्वे पुलाखालील घटना; दोघे ताब्यात

अकोला: कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसने जळगाव खान्देश येथे जात असलेल्या एका प्रवाशाच्या हातातील मोबाइल पळविण्यासाठी रेल्वेखाली उभ्या असलेल्या तिघांनी सदर प्रवाशावर लाठीहल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या लाठीहल्ल्यामुळे प्रवासी रेल्वेतून खाली कोसळल्याने जखमी झाले. आकोट फैल रेल्वे पुलाखाली रेल्वे पटरीवर उभ्या असलेल्या तीन चोरट्यांनी हा प्रताप केला असून यामधील दोघांना जीआरपीने तातडीने अटक केली आहे.जळगाव खान्देश जिल्हय़ातील जामनेर तालुक्यातील फतेपूर येथील रहिवासी अविनाश मोहन पाटील हे महाराष्ट्र एक्स्प्रेसने जळगाव येथे जात असताना ते बोगीच्या गेटमध्ये मोबाइलवर बोलत उभे होते. महाराष्ट्र एक्स्प्रेस आकोट फैलपुलानजीक गेल्यानंतर तेथे पटरीवर उभ्या असलेल्या तिघांनी त्यांच्या हातावर काठीने हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्लय़ामुळे अविनाश पाटील यांच्या हातातील मोबाइल खाली कोसळला. मोबाइल पकडण्यासाठी गेलेल्या पाटील यांचाही तोल गेल्याने ते रेल्वेखाली कोसळले. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच जीआरपी घटनास्थळावर दाखल होऊन त्यांनी संशयावरून दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणी पाटील यांच्या तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९३ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी शेख कय्युम शेख मोहम्मद व गणेश ऊर्फ चंदर प्रजापती या दोघांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी फरार आहे. ही कारवाई जीआरपीचे आर. टी. वानखडे यांच्या मार्गदर्शनात सतीश चव्हाण, गौतम शिरसाट, शरद जुनगडे व पथकाने केली.