शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ महागण्याच्या अहवालावरून संभ्रम

By admin | Updated: November 17, 2015 01:42 IST

डाळींसह कांदा व इतर वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना गत वर्षभरामध्ये फक्त तांदळाचे दरच नियंत्रणात राहिले आहेत. एप्रिलपासून तांदळाच्या किमती वाढण्याऐवजी कमी झाल्या आहेत.

- नामदेव मोरे,  नवी मुंबई डाळींसह कांदा व इतर वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना गत वर्षभरामध्ये फक्त तांदळाचे दरच नियंत्रणात राहिले आहेत. एप्रिलपासून तांदळाच्या किमती वाढण्याऐवजी कमी झाल्या आहेत. परंतु उद्योग मंडळ असोचेमने पुढील महिन्यात तांदळाचे दर वाढणार असल्याचा अहवाल दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सद्यस्थितीमध्ये दरवाढीची शक्यता वाटत नसल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या अहवालाविषयी संभ्रम निर्माण झाला असून कृत्रिम दरवाढ होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. सध्या तांदळाचे दर स्थिर आहेत.एप्रिलमध्ये होलसेल मार्केटमध्ये ७५ ते १०० रुपयांना विकला जाणारा बासमती तांदूळ आता ६० ते ८५ रुपयांना विकला जात आहे. २५ ते ३८ रुपयांना विकला जाणारा मोगरा आता १९ ते २४ रुपये किलो दराने विकला जात आहे. दुबार, तिबार, मोगरा, आयआर ८, एसएलओ या तांदळाच्या किमतीही स्थिरच आहेत. असे असताना उद्योग मंडळ असोचेमने पुढील महिनाभरामध्ये तांदळाच्या दरात वाढ होणार असल्याचा अहवाल दिला आहे. या अहवालामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता सद्यस्थितीमध्ये बाजारभाव वाढण्याची काही शक्यता वाटत नाही. उत्पादन किंवा साठा कमी आहे याविषयी ठोस माहिती नाही. कोणत्या आधारावर तांदूळ महाग होणार याविषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे. मुंबई बाजार समितीमधील अधिकाऱ्यांनी याविषयी सांगितले की, आम्ही मार्केटमध्ये सर्वेक्षण केले. एप्रिलपासून तांदळाच्या दरामध्ये अजिबात वाढ झालेली नाही. बाजारभाव कमी झाले आहेत. नजीकच्या काळात भाववाढ होण्याची शक्यता वाटत नाही. या अहवालामुळे सर्वांमध्ये संभ्रमाची स्थिती असल्याचे मत व्यक्त केले आहे. हा अहवाल कशाच्या आधारावर केला आहे व महागाई वाढणार हे कसे निश्चित केले याविषयी सविस्तर माहिती सर्वांसमोर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मतही एपीएमसीमधील जाणकारांनी व्यक्त केले आहे. टंचाई होण्याची शक्यता जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारामध्ये महत्त्वाचे मंत्री, संघटना यांनी एखाद्या वस्तूचे दर वाढणार असे सांगितले की, काही दिवसांमध्ये त्याचे परिणाम दिसू लागतात. अनेक वेळा अशा प्रकारच्या वक्तव्यानंतर कृत्रिम भाववाढ होत असते. साठेबाजीही वाढत असते. तांदळाच्या भाववाढीच्या अहवालाचाही गैरफायदा घेऊन कृत्रिम भाववाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.