शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘दोन आठवड्यांत पर्जन्यमापक यंत्रे बसवा’

By admin | Updated: July 20, 2016 05:58 IST

मुंबई व उपनगरांत पावसाची नोंद घेणारी ३० स्वयंचलित यंत्रे बसवण्याचा निर्णय मुंबई प्रादेशिक हवामान खाते (आयएमडी- मुंबई) आणि एमएमआरडीएने घेतला

मुंबई : मुंबई व उपनगरांत पावसाची नोंद घेणारी ३० स्वयंचलित यंत्रे बसवण्याचा निर्णय मुंबई प्रादेशिक हवामान खाते (आयएमडी- मुंबई) आणि एमएमआरडीएने घेतला होता. त्यासाठी ३० मार्च २०१६ अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. मात्र, अद्याप आठच यंत्रे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे उर्वरित यंत्रे येत्या दोन आठवड्यांत बसवा, असा आदेश उच्च न्यायालयाने आयएमडी मुंबई आणि एमएआरडीएला दिला आहे, तसेच २६ जुलै २००५ च्या जलप्रलयानंतर मिठी नदीला पुन्हा पूर येऊ नये, यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र येत्या दोन आठवड्यांत पालिकेला सादर करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. गेल्या वर्षी १९ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पूर्ण दिवस मुंबई ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईचे आर्थिक नुकसान झाले व लोकांचेही हाल झाले. हवामान खात्याने जोरदार पावसाची पूर्वकल्पना दिली असती, तर नागरिकांचे हाल झाले नसते. त्यामुळे हवामानाचे अचूक वेध घेण्याचे निर्देश मुंबई आयएमडीला द्यावेत, तसेच पावसाची नोंद घेणारी अधिक स्वयंचलित यंत्रे बसवण्यात यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले अटल दुबे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. त्यावरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. मंगळवारी आयएमडी मुंबईने उच्च न्यायालयाला सांगितले की, उपनगरांत डॉप्लर बसवण्यासाठी काही जागा शोधण्यात आल्या आहेत. दिल्ली मुख्यालयापुढे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर खंडपीठाने या प्रस्तावावर चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश आयमडीच्या दिल्ली मुख्यालयाला दिले आहेत.मुंबईत २६ जुलै २००५ रोजी आलेल्या महाप्रलयानंतर याविषयी अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चितळे समितीने अहवालात नमूद केलेल्या शिफारशींवर किती अंमलबजावणी केलीत? अशी विचारणा करत, उच्च न्यायालयाने महापालिकेला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)