शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संपात फूट!

By admin | Updated: June 4, 2017 06:19 IST

संपकरी शेतकऱ्यांची समिती व मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णय मान्य न झाल्याचे सांगत शनिवारी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले.

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : संपकरी शेतकऱ्यांची समिती व मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णय मान्य न झाल्याचे सांगत शनिवारी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले. एकीकडे संप मिटल्याची घोषणा आणि दुसरीकडे संप कायम ठेवण्याची भूमिका जाहीर झाल्याने संपात उभी फूट पडल्याचे चित्र आहे.पुणतांब्यात ग्रामसभा झाली, त्यात संपाचा निर्धार कायम ठेवण्यात आला. दुपारनंतर नगर जिल्ह्यात पुन्हा बैठकांना वेग आला. नाशिक जिल्ह्यातही आंदोलनाची धग कायम होती. नैताळे येथे आंदोलकांवर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांनी लाठीमार केला. कोल्हापुरात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदे फेकले. साताऱ्यातही बंद पाळण्यात आला. पुण्यात शनिवारी पिशवीबंद दूधपुरवठा विस्कळीत झाला. खान्देशातही संपाची धग कायम होती. बाजार समित्यांमध्ये अल्प प्रमाणात व्यवहार झाले.मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत संप सुरू होता. सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे औरंगाबादेतील क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. नागपुरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. रस्त्यावर दूध फेकून शासनाचा निषेध करण्यात आला. अकोला जिल्ह्यात अकोटमध्ये दूध उत्पादकांनी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून रस्त्यावर दूध, भाजीपाला फेकला.शेतकरी युद्धात जिंकला;तहात हरला - पवारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना गंडवले, असा आरोप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला आहे. शेतकरी संपामागे काँग्रेस व राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप करणे म्हणजे पोरकटपणा आहे. शेतकरी युद्धात जिंकला पण तहात हरला, असे पवार म्हणाले. कर्जमाफी केवळ अल्पभूधारकांनाच का? सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती, असे ते म्हणाले.