मेहकर (जि. बुलडाणा), दि. २ : मनसे कार्यकर्त्यांंनी येथील ग्रामीण रुग्णालयात एका कर्मचार्याच्या तोंडाला काळे फासल्याप्रकरणी, पोलिसांनी शुक्रवारी मनसेच्या सात कार्यकर्त्यांंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.काही कारणावरून रुग्णालयातील कर्मचारी जी. एन. श्रीनाथ यांच्यासोबत शुक्रवारी लक्ष्मण जाधव यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांंचा वाद झाला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांंनी श्रीनाथ यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना घडली. याप्रकरणी जी.एन. श्रीनाथ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मनसेच्या लक्ष्मण जाधव यांच्यासह ७ जणांविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३२३, १४३ नुसार गुन्हा दाखल केला
रुग्णालय कर्मचा-यास काळे फासले
By admin | Updated: September 3, 2016 01:52 IST