शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘वेकोलि’त कर्मचारी भरती घोटाळा

By admin | Updated: October 18, 2015 02:23 IST

निवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांनी स्वत:ला ‘अनफिट’ दाखवून आपल्या जागेवर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये (वेकोलि) सग्यासोयऱ्यांची नियुक्ती करून घेतल्याची धक्कादायक

- नरेश डोंगरे,  नागपूरनिवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांनी स्वत:ला ‘अनफिट’ दाखवून आपल्या जागेवर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये (वेकोलि) सग्यासोयऱ्यांची नियुक्ती करून घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गेल्या चार वर्षांत ६०० पेक्षा जास्त जणांनी अशा प्रकारे ‘वेकोलि’त वर्णी लावली आहे.संबंधित पदभरती घोटाळ्याची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर केंद्रीय अण्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. निवृत्तीला शेवटचे काही वर्ष शिल्लक असताना प्रकृती अस्वास्थ्याची कुरबूर सुरू करायची. दर महिन्याला वेगवेगळे प्रमाणपत्र गोळा करायचे. सातत्याने काहीतरी कारण दाखवून काम होत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत आणायचे आणि स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज द्यायचा. सोबतच आपला पाल्य किंवा जवळच्या नातेवाईकाला आपल्या जागेवर नियुक्त करण्याचाही विनंती अर्ज द्यायचा, असे प्रकार काही वर्षात ‘वेकोलि’त वाढले आहेत. त्याची फारशी चौकशी तसेच आडकाठी होत नसल्याने तीन-चार वर्षांत ६०० ते ७०० जणांनी त्यांच्या नातेवाईकांना नोकरीवर लावले. ‘वेकोलि’च्या विदर्भातील अनेक खाणींमध्ये हा ‘अर्थपूर्ण गैरप्रकार’ बिनदिक्कत सुरू होता. मोठी साखळी कार्यरतघोटाळ्याची कुणकुण लागल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी सुरू केली. चौकशीनंतर या घोटाळ्यात एक मोठी साखळीच कार्यरत धक्कादायक वास्तव उघड झाले.२० जणांविरुद्ध गुन्हासंबंधित गैरप्रकारामुळे पात्र उमेदवारांना रोजगारापासून वंचित ठेवण्यात आल्याचा निष्कर्ष सीबीआय अधिकाऱ्यांनी नोंदवला. पहिल्या टप्प्यात सीबीआयने २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे. होय, बोगस नियुक्तीचा घोटाळा उघड झाला आहे. सीबीआयने २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळे यापेक्षा अधिक काही सांगणे योग्य होणार नाही.- संदीप तामगाडगे, पोलीस अधीक्षक, सीबीआय, नागपूर युनिट