शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

रायगड जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांचा मार्च महिन्याचा सुमारे २५ कोटी रुपयांचा पगार थकला आहे.

By admin | Updated: April 27, 2016 03:21 IST

रायगड जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांचा मार्च महिन्याचा सुमारे २५ कोटी रुपयांचा पगार थकला आहे.

आविष्कार देसाई,

अलिबाग-रायगड जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांचा मार्च महिन्याचा सुमारे २५ कोटी रुपयांचा पगार थकला आहे. सेवार्थ प्रणालीद्वारे पगार होत असल्याने मार्च महिन्यापाठोपाठ आता एप्रिल महिन्यातील २५ कोटी रुपयांचे पगार थकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्मचारी आणि शिक्षक मेटाकुटीला आले आहेत.रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा गाडा ओढण्याचे काम विविध कर्मचारी यांच्यामार्फत होते. सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचे काम त्यांच्याकडून होत असते.ग्रामीण भागाचा कणा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून पगार वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी संघटनेमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. सरकारने वेळेवर वेतन अदा करावे अशी मागणी केली जात आहे. सरकारचे मार्च एंडिंगचे काम अद्याप सुरु असून सेवार्थ प्रणालीद्वारे पगार होतात. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे पगार होण्याला उशीर होत असल्याचे अर्थ विभागाकडून सांगण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन रायगडचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.रायगड जिल्हा परिषदेमध्ये सुमारे ११ हजार कर्मचारी आणि शिक्षक आहेत. मार्च महिन्याच्या पगाराचा अद्याप पत्ता नाही. मार्च महिन्याचा फक्त शिक्षकांचाच सुमारे २० कोटी रुपयांचा पगार आहे, तर उर्वरित पाच कोटी रुपये कर्मचाऱ्यांचा असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. मार्चचा पगार अद्याप मिळालेला नाही.