शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरात डाळीची साठेबाजी सुरूच

By admin | Updated: July 14, 2016 21:21 IST

बाजारात तूर व चणा डाळीच्या वाढत्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पुरवठा विभागाने गुरुवारी वडोदा येथील शुभम लॉजिस्टीक वेअर हाऊसच्या गोदामावर

२०६ क्विंटल तूर, ८५० क्विंटल चणा साठा जप्त : जिल्हा प्रशासनाची कारवाईनागपूर : बाजारात तूर व चणा डाळीच्या वाढत्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पुरवठा विभागाने गुरुवारी वडोदा येथील शुभम लॉजिस्टीक वेअर हाऊसच्या गोदामावर धाड टाकली. या धाडीमध्ये २०६ क्विंटल तुरीचा साठा व ८५० क्विंटल चणा जप्त करण्यात आला आहे.वडोदा येथे शुभम लॉजिस्टीक वेअर हाऊस या नावाने अन्नधान्य साठवणुकीसाठीचे गोदाम असून त्या ठिकाणी मे. करण टेड्रींग कंपनीचे प्रोपा. राकेश ओमप्रकाश अग्रवाल यांनी ४५० क्विंटल चणा तसेच मे. कल्पना ट्रेडींग कंपनीचे प्रोपा. लक्ष्मीकांत मेघराज तेलमासरे यांनी ४०० क्विंटल चणा साठवणूक करुन ठेवल्याचे आढळून आले. याबाबत आवश्यक असलेला रेकार्ड जसे साठा रजिस्टर, बिल बुक, विक्री रजिस्टर, सी फार्म तपासणीच्या वेळी सादर न केल्यामुळे हा साठा जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने जप्त केला. तसेच मे. वासुदेव अ‍ॅग्रो यांनी २०६ क्विंटल तुरीचा साठा या गोदामामध्ये विनापरवाना ठेवल्याने हा साठादेखील जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने जप्त केला. जप्त साठ्याची अंदाजे किंमत ८७०० रुपये प्रती क्विंटल तूर याप्रमाणे व चणा अंदाजे किंमत ८ हजार रुपये प्रती क्विंटल याप्रमाणे एकूण ८५ लाख ९२ हजार २०० रुपये इतकी आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी एन.आर. वंजारी, निरीक्षक अधिकारी पी.एल.कुबडे, पुरवठा निरीक्षक प्रशांत शेंडे यांनी केली. पुढील कारवाई जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या तरतुदीनूसार करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.