शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

एसटी टोलमुक्त करणार

By admin | Updated: January 1, 2015 03:11 IST

एसटीला मोठ्या प्रमाणात टोलचा भुर्दंड पडत असून, त्यातून मुक्ती देण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.

मुंबई : एसटीला मोठ्या प्रमाणात टोलचा भुर्दंड पडत असून, त्यातून मुक्ती देण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. एसटीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी एसटीच्या मुख्यालयास भेट दिली. त्यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत रावते यांनी ही माहिती दिली. यावेळी बैठकीत एसटीचे प्रभारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच परिवहन आयुक्त महेश झगडे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व बस स्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेस प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी एसटी अधिकाऱ्यांना केली. अपघातग्रस्त प्रवाशांच्या भरपाईमागे एसटी वर्षाला ४0 कोटी रुपये भुर्दंड पडत आहे. हा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी प्रवाशांचा विमा काढण्याचा पर्याय एसटी अधिकाऱ्यांनी शोधावा. एखाद्या विमा कंपनीला याचे काम दिल्यास एसटीला त्याचा हफ्ता किती बसेल याची माहिती घ्यावी आणि त्यादृष्टीने पाऊल उचलण्यात यावे, अशी सूचनाही करण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे मार्गावरील बसमध्ये लवकरच सीएनजीच्या वापराबाबत कार्यवाही करावी, ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी बसच्या बांधणीत बदल करून सामान ठेवण्यासाठी विशेष कप्पा तयार करता येतो का याची चाचपणी केली जावी, अशा सूचनाही परिवहन मंत्र्यांकडून एसटी अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. इथेनॉलचा वापर डिझेलसाठी...राज्यातील साखर कारखान्यातून मोठ्या प्रमाणात इथेनॉल बाहेर पडतो. या इथेनॉलच्या वापरातून डिझेलचा पर्याय शोधण्यात यावा, अशी एक महत्त्वाची सूचना रावते यांनी केली. सौरऊर्जा वापरावीज वापरावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खर्चात कपात करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करावा, एसटीच्या बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्त्वावरील नवीन प्रकल्पास स्थगिती देत यापुढे एसटीच्या हितास प्राधान्य देणाऱ्या प्रकल्पांचा विचार होणार असल्याचे रावते यांनी सांगितले.