शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

सहलीसाठी एसटीला ठेंगा खासगीकडे धाव

By admin | Updated: January 16, 2017 23:38 IST

शाळा-महाविद्यालयाची सहल म्हटली की पूर्वी पटकन एसटी डोळ््यासमोर यायची. एसटी महामंडळाकडून शालेय सहलीसाठी ५० टक्के सवलतही देण्यात येते.

दयानंद पाईकराव / ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 16 - शाळा-महाविद्यालयाची सहल म्हटली की पूर्वी पटकन एसटी डोळ्यासमोर यायची. एसटी महामंडळाकडून शालेय सहलीसाठी ५० टक्के सवलतही देण्यात येते. परंतू नागपूर शहर आणि जिल्ह्यात साडे सात हजारावर शाळा-महाविद्यालये असूनही मागील तीन महिन्यांत सहलीसाठी केवळ १०५ एसटीच्या बसेस बुक झाल्याची धक्कादायक माहिती आहे. हजारो शाळांनी सहलीसाठी एसटीच्या बसला ठेंगा दाखवून खासगी बसेसकडे धाव घेतल्याची वस्तुस्थिती आहे.

शाळा-महाविद्यालयाच्या सहलीसाठी एसटी महामंडळातर्फे एकूण किलोमीटरच्या २० टक्के रक्कम अमानत म्हणून आधी भरावी लागते. नागपूर शहरात जवळपास दोन हजार शाळा-महाविद्यालये आहेत. तर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १७०० शाळा, खासगी संस्थेच्या ३,५०० शाळा आहेत. हा आकडा ७,२०० च्या जवळपास आहे. परंतु असे असताना केवळ १०५ शाळांनीच सहलीसाठी एसटी महामंडळाच्या बसला पसंती दिल्याचे धक्कादायक वास्तव आहे. सहलीसाठी एसटीची बस भाड्याने घेण्यासाठी एसटी महामंडळाचे अनेक नियम आणि क्लिष्ट प्रक्रिया आहे. एसटीची बस सहलीसाठी नेण्यापूर्वी महामंडळाला संबंधित शाळेचे पत्र, विद्यार्थ्यांची मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेली यादी, अमानत रक्कम आदी क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागते. याशिवाय एकदा दिलेल्या यादीनंतर त्यात एकही विद्यार्थी जास्त बसविणे एसटीच्या नियमात बसत नाही. उलट खासगी बसचे संचालक अशा कोणत्याच अटी, विद्यार्थी संख्येची मर्यादा घालून देत नसल्यामुळे सहलीसाठी खासगी बसला प्राधान्य देण्यात येत आहे.

याशिवाय एसटीच्या बसमध्ये बसण्याची आसनव्यवस्था खासगी बसच्या तुलनेत एवढी आरामदायक नसते हेसुद्धा त्या मागील एक कारण आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सहलीसाठी एसटी महामंडळाच्या बसेसची मागणी बंद होऊ लागली आहे. याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. एसटी महामंडळाने सध्या उत्पन्न वाढविण्यासाठी विविध पारितोषिक जाहीर केले आहेत. जर महामंडळाने सहलीसाठी जाणाऱ्या बसेसचे नियम शिथिल करून सोयी-सुविधा उपलब्ध केल्यास नक्कीच महामंडळाचा महसुल वाढण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)महामंडळाचे कार्य शासनाच्या नियमानुसार-एसटी महामंडळाला शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार काम करावे लागते. महामंडळ सहलीसाठी शाळा-महाविद्यालयांना अनुदान देते. बससाठी शाळेचे पत्र, विद्यार्थ्यांची यादी, डिपॉझीट आदी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. कदाचित ही प्रक्रिया क्लिष्ट वाटत असावी यामुळे एसटीच्या बसेसची मागणी कमी झाली असावी.-सुधीर पंचभाई, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग