शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी पुरविणार बससेवा

By admin | Updated: June 3, 2016 00:48 IST

औद्योगिक तसेच आयटी कंपन्यांच्या परिसरातील नागरिकांना आणि कंपन्यांच्या परिसरातील कामगारांना प्रवासी वाहतूकसेवा पुरविण्याचा अभिनव उपक्रम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हाती घेतला आहे.

पुणे : औद्योगिक तसेच आयटी कंपन्यांच्या परिसरातील नागरिकांना आणि कंपन्यांच्या परिसरातील कामगारांना प्रवासी वाहतूकसेवा पुरविण्याचा अभिनव उपक्रम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हाती घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर राजगुरुनगर बसस्थानकाहून आजूबाजूच्या परिसरात असलेल्या खासगी कंपन्यांमध्ये कामाला जाण्याची सोय व्हावी, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बस सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी दोन खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी १०० पास काढले आहेत. ही योजना यशस्वी झाल्यास त्याचा वापर पुणे विभागात सुरू केला जाणार असल्याची माहिती पुणे विभागाचे नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली. खासगी बस कंपन्यांना स्पर्धा करण्यासाठी, तसेच प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे मैंद यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. पुणे शहराच्या परिसरातील औद्योगिक कंपन्यांना अनेकदा हंगामी कर्मचाऱ्यांना बसची गरज असते. तर, या खासगी बसच्या तुलनेत एसटीच्या गाड्यांचे दर कमी आहेत. त्यामुळे ही सेवा देण्यासाठी एसटीने पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)

>स्वारगेट, शिवाजीनगरची सुरक्षितता वाढविणारशहरात एसटीचे स्वारगेट, शिवाजीनगर, तसेच पुणे स्टेशन हे तीन प्रमुख बसस्थानके आहेत. या स्थानकांच्या परिसरात बंदी असतानाही खासगी वाहने सर्रास येतात. काही वेळेला एजंट बसस्थानकांवर येऊन प्रवाशांना खासगी वाहनांमधून नेण्यासाठी गळ घालतात. हे प्रकार थांबवण्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर व पिंपरी-चिंचवड बसस्थानकांच्या प्रवेशद्वारांवर प्रशस्त गेट लावण्याचे काम काही दिवसांत हाती घेण्यात येणार आहे. स्वारगेट बसस्थानकामध्ये शंकरशेठ रस्त्यावर अशा प्रकारचे गेट लावले असून, सातारा रस्त्याच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येणार आहे. या सर्व प्रवेशद्वारांवर २४ तास सुरक्षारक्षक नेमला जाईल. याशिवाय या स्थानकांमध्ये असलेली प्रवाशांची गर्दी, तसेच आवश्यक सुरक्षितता लक्षात घेऊन जादा सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, बंद असलेले मेटल डिटेक्टर पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे मैंद यांनी स्पष्ट केले.पुण्यातून सुरू असलेली शिवनेरी बससेवा आणखी विस्तार आहे. येत्या काही दिवसांत पुणे विभागात आणखी १५ नवीन स्कॅर्निया बस दाखल होणार आहेत. या पूर्वीच १५ बस दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी प्रवाशांना आणखी आरामदायी सेवा देण्यासाठी नवीन मार्गांची आखणीही एसटी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.