शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची दुचाकीला धडक, एक ठार

By admin | Updated: June 6, 2016 03:26 IST

बसवरील नियंत्रण सुटतानाच पुढे असणारी दुचाकीही न दिसल्याने एसटीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका सहप्रवाशाचा मृत्यू तर दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली

मुंबई : बसवरील नियंत्रण सुटतानाच पुढे असणारी दुचाकीही न दिसल्याने एसटीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका सहप्रवाशाचा मृत्यू तर दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. दादर पुर्वेकडील जगन्नाथ शंकरशेठर पुलावर झालेल्या या अपघातानंतर त्वरीत अन्य तीन वाहनांनीही एसटीला मागून धडक दिली. या घटनेत एसटी बस चालकाविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटीच्या डौली-परळ बस सेवेवर चालक सुरेश शिंदे हे कार्यरत होते. ही बस रात्री साडे अकराच्या सुमारास दादर पुर्वेच्या जगन्नाथ शंकर शेठ पुलावरुन जात होती. बस चालवत असतानाच नियंत्रण ठेवता न आल्याने पुढूनच जाणाऱ्या दुचाकीस्वाराला बसने धडक दिली. ही धडक देताच दुचाकीस्वार दुबेर शेख (२४) हा जखमी झाला. तर अफजल शेख (४५) हे ठार झाले. धडक लागून बस थांबताच मागून येणाऱ्या स्वीफ्ट कारने बसला धडक दिली आणि त्यामागोमाग अन्य दोन काळ्या-पिवळ्या टॅक्सीनेही धडक दिली. या घटनेनंतर उपस्थित अन्य वाहनांच्या चालकांनी एसटीचे चालक शिंदे यांना पकडले आणि पोलिसांना बोलावून त्यांच्या हवाली केले. माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. मुंबईत पावसाने थोडा शिडकावा केल्यानंतर बससमोरील वाहने दिसली नसल्यानेच अपघात घडल्याची माहीती चालकाने पोलिसांना दिली असल्याचे माटुंगा पोलिसांकडून सांगण्यात आले. परंतु दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्षक एसटी महामंडळाकडून काढण्यात आला आहे. मात्र अधिक तपास केला जात असल्याचे माटुंगा पोलिसांनी सांगितले. अपघातातील मृत अफजल शेख हे भायखळातील जनता सेवक सोसायटीत राहात होते. तर जखमी दुबेर शेख हे एच.एम.अन्सारी मार्गावरील पत्रा चाळ येथे राहातात. (प्रतिनिधी)