शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांच्या वेतन कराराला ‘आचारसंहिता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 05:39 IST

तब्बल २४ महिन्यांपासून रखडलेला वेतन करार महाराष्ट्र दिनीदेखील होणार नसल्याचे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) स्पष्ट केले आहे

मुंबई : तब्बल २४ महिन्यांपासून रखडलेला वेतन करार महाराष्ट्र दिनीदेखील होणार नसल्याचे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने राज्यात लोकसभा व अन्य पोटनिवडणुकांमुळे आचारसंहिता लागू केली आहे. २ जून अखेर ही आचारसंहिता असल्यामुळे, तूर्तास वेतन कराराची घोषणा होणार नसल्याचे महामंडळाने जाहीर केले.महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर एक लाखांहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात घोषणा करण्यात येईल, असे आश्वासन या महिन्याच्या सुरुवातीलाच परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले होते. मात्र, त्या वेळी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नव्हत्या. दोन दिवसांपूर्वी राज्यातील ३५ पैकी २८ जिल्ह्यांना २ जूनअखेर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे या काळात कुठलीही घोषणा करण्यास प्रतिबंध आहे.दरम्यान, या प्रकरणी सोमवारी झालेल्या बैठकीत मान्यताप्राप्त संघटना ३१/०३/१६चे मूळ वेतन+३५०० गुणिले २.५७ या आपल्या प्रस्तावावर ठाम राहिली. एसटी अध्यक्ष तथा परिवहनमंत्री यांनी फक्त भत्ते व सीटीसी वगळता ७५०/- कोटींचे देऊ केले व यामध्ये आपले सूत्र बसविण्याचा आग्रह केला, परंतु यामध्ये आयोगाचा २.५७चा प्रस्ताव बसत नाही. त्यामुळे मूळ वेतन गुणिले २.४१, तसेच मूळ वेतनात वाढ नाही, असा प्रस्ताव संघटनेसमोर ठेवण्यात आला. मात्र, मंत्री रावते यांच्या दोन्ही प्रस्तावात असमाधानकारक वाढ असल्यने संघटनेने प्रस्ताव फेटाळला. आम्ही केव्हाही चर्चेस तयार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटना मान्यताप्राप्त संघटनेने दिली.