शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

नियोजनशून्य कारभारामुळे एसटी कर्मचारी तणावात

By admin | Updated: September 29, 2016 00:58 IST

वाहक- चालक हे एसटी महामंडळाचे आत्मा आहेत़ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्यांच्यावर मानसिक ताण वाढला आहे़ वाहक-चालकांची मानसिक स्थिती, ताणतणाव

पिंपरी (पुणे) : वाहक- चालक हे एसटी महामंडळाचे आत्मा आहेत़ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्यांच्यावर मानसिक ताण वाढला आहे़ वाहक-चालकांची मानसिक स्थिती, ताणतणाव जाणून घेऊन अधिकाऱ्यांनी निर्णायक भूमिका घेणे गरजेचे आहे, असे मत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले.केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी) आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे आयोजित तीन दिवसीय वाहक-चालक सपत्निक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सीआयआरटीच्या इमारतीत रावते यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते़ प्रादेशिक परिवहन विभागप्रमुख जितेंद्र पाटील, सीआयआरटीचे प्रभारी आशिष मिश्रा, राज्य परिवहन मंडळाचे महाव्यवस्थापक सूर्यकांत अंबाडेकर, के ़ माधवराज, बी़ एम़ जाधव हे यावेळी उपस्थित होते़ चालकांना अनेक अडचणी आहेत़ त्यांची मानसिकता अधिकाऱ्यांनी समजवून घेतली पाहिजे़ प्रवाशांची काळजी घेण्यासाठी वाहक आणि चालक जबाबदारी पार पाडतात़ त्यासोबत त्यांच्या पत्नी महत्त्वाची भूमिका निभावतात, असे सांगू रावते यांनी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा गौरव केला़ काही दिवसांपूर्वी कामचुकारपणा केल्यामुळे सुमारे १७ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते़ मात्र, कुटुंब सार्वजनिक योजनेंतर्गत त्या सर्वांना पुन्हा एकदा संधी देऊन कामावर घेण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे़ प्रवाशांची काळजी घेण्यासाठी अधिकाऱ्यांपासून सर्वसामान्य कामगारापर्यंत सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. वाहनचालकांच्या मुलांसाठी आॅटोमोबाइल महाविद्यालयाची स्थापना करण्यात येत आहे़ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पांढरकवडा, नाशिक, पालघर, गडचिरोली, रत्नागिरी येथे उच्च दर्जाची प्रशिक्षण केंद्रे उभारली जाणार आहेत, असे रावते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)