शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळ आणि संघटनेत जुंपली

By admin | Updated: April 22, 2017 03:17 IST

कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत गेले वर्षभर निर्णय होत नसल्याने, एसटी महामंडळ आणि मान्यताप्राप्त एसटी संघटनेत चांगलीच जुंपली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या

मुंबई : कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत गेले वर्षभर निर्णय होत नसल्याने, एसटी महामंडळ आणि मान्यताप्राप्त एसटी संघटनेत चांगलीच जुंपली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून, निर्णय मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत एक लाखाहून अधिक कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेण्याचे निर्देश परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडून एसटी प्रशासनाला देण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरापासून एसटीचे लाखो कर्मचारी वेतनवाढीपासून वंचित असून, अद्यापही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी वेतन करारातील काही मागण्या, सातवा वेतन आयोग आणि २५ टक्के हंगामी वाढ या मुद्द्यांवर एसटी महामंडळ व मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेत बैठक पार पडली. त्या वेळी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीवर संघटनेकडून ठाम भूमिका मांडण्यात आली. एसटी कामगारांना कोणत्याही परिस्थितीत काम करावे लागते. त्यामुळे एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त वेतन मिळणे आवश्यक आहे. एसटी कामगारांच्या वेतनवाढीच्या मागणीचा वेळीच सकारात्मक निर्णय झाला असता, तर कामगारांमधील असंतोष काही प्रमाणात दूर होणे शक्य झाले असते, अशी अप्रत्यक्ष टीका संघटनेकडून एसटी प्रशासनावर करण्यात आली. त्यानंतर, शुक्रवारी एसटी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात रावते यांनी ३० एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. याचबरोबर, वेतन करारासंदर्भात आतापर्यंत झालेल्या वाटाघाटी बैठकीत वेतनवाढीसारखा मूळ विषय सोडून, इतर बाबींवर जास्त चर्चा करण्यात संघटनेने स्वारस्य दाखवल्याचा थेट आरोपच केला. प्रशासनाने पहिल्या बैठकीपासून ते आतापर्यंत, सातवा वेतन आयोगाची मागणी अयोग्य असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. तरीदेखील संघटनेने एकाच मागणीवर अडून बसून वाटाघाटीच्या अनेक फेऱ्या, इतर छोट्या-छोट्या मागण्यांवर चर्चा करण्यात घालवल्याचेही पत्रकातून सांगितले, तर याच कालावधीमध्ये १२,५१४ कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत संघटनेने अनास्था दाखवल्याची टीकाही एसटीकडून करण्यात आली आहे. अशा प्रकारचे आरोप आणि टीकांची यादीच एसटी प्रशासनाकडून सादर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)एसटी कामगारांच्या वेतन कराराची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली. तत्पूर्वी १ जानेवारी २०१६ रोजी मान्यताप्राप्त संघटनेने आपल्या मागण्या प्रशासनाकडे सादर केल्या, परंतु त्यानंतर ८ महिन्यांनी प्रशासनाने या संदर्भात समितीची स्थापना केली. त्यामुळे संघटनेकडून विलंब केला जात असल्याचा आरोप खोटा आहे. - संदीप शिंदे, मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना-अध्यक्ष