शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

एसटी महामंडळातील वसुली होणार रद्द

By admin | Updated: November 1, 2015 01:50 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाने ६७१ वाहक आणि चालकांकडून २.५१ कोटी रुपये वसूल करण्याची १० वर्षांपूर्वी केलेली कारवाई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाने ६७१ वाहक आणि चालकांकडून २.५१ कोटी रुपये वसूल करण्याची १० वर्षांपूर्वी केलेली कारवाई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.जे वाहक-चालक सेवेत आहेत, त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाऊ नये आणि निवृत्त झालेल्या ज्या वाहन-चालकांच्या देण्यांमधून ही रक्कम कापण्यात आली आहे, त्यांना ती परत करण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. महामंडळाने या नोटिसा २ फेब्रुवारी २००५ रोजी बजावल्या होत्या. प्रत्येकाकडून सरासरी चार ते पाच हजार रुपयांची वसुली केली जाणार होती. याविरुद्ध महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दाद मागितली असता, औद्योगिक न्यायालयाने सप्टेंबर २००५ मध्ये या वसुली नोटिसा रद्द केल्या होत्या. महामंडळाने केलेले अपिल हायकोर्टात प्रलंबित होते. मध्यंतरी ज्यांच्याकडून वसुली करायची आहे, असे ते निवृत्त झाले, तर वसुली करता येणार नाही, असा अर्ज महामंडळाने केला होता. तेव्हा न्यायालयाने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या देय देण्यांमधून ही वसुलीची रक्कम कापून घ्यावी व ती बँकेत ठेवावी, अशी अंतरिम मुभा दिली होती. आता अंतिम सुनावणीनंतर न्या. रवींद्र घुगे यांनी महामंडळाचे अपिल फेटाळले व वसुली रद्द केली. (विशेष प्रतिनिधी)काय होते नेमके प्रकरण?लांब पल्ल्याच्या बस घेऊन जाणाऱ्या चालक-वाहकांनी सलग दोन दिवस ड्युटी केली, तर मूळ आगारात परत आल्यावर तिसऱ्या दिवशी त्यांना सुट्टी दिली जाते. महामंडळाच्या लातूर विभागात १९९१ ते २००० या १० वर्षांत अनेक वाहक-चालकांना अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष काम न करताही, त्यांची हजेरी लावून त्यांना त्या दिवसाचा पगार दिला गेला, असे डिसेंबर २००१ मध्ये केलेल्या लेखा परीक्षणात स्पष्ट झाले. लेखा परीक्षकांनी अशा प्रकारे एकूण दोन कोटी ५१ लाख ४३ हजार रुपये अनाठायी दिले गेल्याचे नमूद केले. त्यानंतर महामंडळाने संबंधित वाहक-चालकांकडून ही रक्कम वसूल करण्याची कारवाई सुरू केली.अधिकाऱ्यांना पाठीशी घातलेन्यायालयाने म्हटले की, खरे तर ‘तिसऱ्या दिवशी’ काम न करूनही वाहक-चालकांची हजेरी लावणाऱ्या अधिकाऱ्यांना महामंडळाने जबाबदार धरायला हवे होते, पण तसे केले गेले नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून हजेरीच्या बनावट नोंदी तयार केल्या, असे महामंडळाचे म्हणणे नाही किंवा त्यास कोणताही पुरावा नाही. महामंडळाने या कर्मचाऱ्यांवर रीतसर खातेनिहाय चौकशीही केलेली नाही. अशा परिस्थितीत पगारातून दिले गेलेले एक दिवसाचे जादा पैसे महामंडळ वसूल करू शकत नाही.