शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘भंगारा’तील एसटी बसची होणार पुनर्बांधणी

By admin | Updated: August 27, 2016 05:14 IST

एसटीकडून सवलतीच्या पासाची सुविधा दिली जात असतानाच आता आणखी एक नवी योजना एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी आणली जाणार आहे.

मुंबई : शाळा,महाविद्यालयांमध्ये जाण्या-येण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटीकडून सवलतीच्या पासाची सुविधा दिली जात असतानाच आता आणखी एक नवी योजना एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी आणली जाणार आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहलीसाठी एसटीच्या बस उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी एसटीकडून भंगारात काढण्यात येणाऱ्या बसेसची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यासाठीचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. एसटी महामंडळाच्या सवलतीतील पासाची सुविधा सध्या शाळा व महाविद्यालयातील जवळपास १६ लाख विद्यार्थ्यांना मिळत आहे. या विद्यार्थ्यांना पासात ६६ टक्के सवलत दिली जाते. याचा सर्वाधिक फायदा हा शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळतो. मात्र पास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना बस स्थानक, आगार किंवा वाहतूक नियंत्रण कक्षावर जावे लागते. यात बराच वेळ खर्ची करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबावी यासाठी महामंडळाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पास वितरित करण्याचा नुकताच निर्णय घेतला. त्यामुळे मोठा दिलासा विद्यार्थ्यांना मिळाला. यानंतर विद्यार्थ्यांसाठी आणखी एक सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सहली जात असतात. त्या वेळी त्यांना एसटीच्या बस उपलब्ध केल्या जातात. मात्र सेवेत असलेल्या बसेस उपलब्ध करताना एसटीला मोठी अडचण निर्माण येते. शाळा, महाविद्यालयांची ही परवड थांबावी आणि विद्यार्थ्यांची सहलीनिमित्त सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी महामंडळाने एसटीच्याच बसेस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)>दररवर्षी दोन हजार बस भंगारातएसटीकडून वर्षाला जवळपास दोन हजार बसेस भंगारात काढल्या जातात. त्या पूर्णपणे मोडीत काढल्यानंतर तेवढ्याच बसेस नव्याने बांधून ताफ्यात दाखल करण्यात येतात. भंगारात काढण्यात येणाऱ्या बसेसची संख्या पाहता यातील काही बसेसची पुनर्बांधणी करून त्या विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी वापरात आणण्याचे नियोजन केले आहे.