शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची वातानुकूलित शिवनेरी बस उत्पन्नातही ‘सुसाट’

By admin | Updated: June 24, 2016 04:52 IST

एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी एसी शिवनेरी सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या पसंतीस उतरण्यास बराच कालावधी लागला

सुशांत मोरे,  मुंबईएसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी एसी शिवनेरी सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या पसंतीस उतरण्यास बराच कालावधी लागला. मात्र, फक्त एसी सेवा असलेल्या आणि अन्य कोणत्याही सुविधा नसलेल्या याच सेवेने एसटी महामंडळाला चांगले उत्पन्न देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार वर्षांत तर शिवनेरीने दिलेल्या सर्वोत्तम सेवेमुळे जवळपास ३६ कोटींची वाढ उत्पन्नात झाली आहे. शिवनेरी बसला मिळणारा प्रतिसाद पाहता, आणखी काही सेवा सुरू करण्याचा विचार महामंडळाकडून केला जात आहे. एसटी महामंडळाकडून लाल डबा बस, निमआराम बसबरोबरच मिडी बस चालवण्यात येत होत्या. या सेवांबरोबरच प्रवाशांना आणखी दर्जेदार सेवा देण्यासाठी २00२ साली दादर ते पुणे मार्गावर एसटी महामंडळाने पहिली एसी शिवनेरी बस सेवा सुरू केली. शिवनेरी सुरू करताच, ती सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरण्यास थोडा कालावधी लागला. मात्र, विना अपघात सर्वोत्तम सेवा देत असल्याने आणि मुंबई-पुणेदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्यांनाही ती सोईस्कर वाटत असल्याने, त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, कालांतराने शिवनेरी सेवा अन्य मार्गांवरही सुरू करण्यात आली. फक्त एसी सेवा असणारी आणि त्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही सुविधा नसणाऱ्या शिवनेरीने मात्र, महामंडळाला चांगले उत्पन्न देण्यास सुरुवात केली आहे. २0१२-१३ साली ११२ कोटी ४७ लाख रुपये उत्पन्न शिवनेरी सेवेतून महामंडळाला मिळाले होते. २0१५-१६ साली हेच उत्पन्न १४८ कोटी ७२ लाख एवढे झाल्याचे एसटीतील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. उत्पन्नात जवळपास ३६ कोटी २५ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. अन्य खासगी एसी बसमध्ये असणाऱ्या वाय-फाय सुविधांप्रमाणे शिवनेरीत वाय-फायसारखी सुविधा नाही. त्याचप्रमाणे, सीसीटीव्ही आणि व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिमही नाही. मात्र, वेळेवर आणि विनाअपघात प्रवास देत असल्यानेच, प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते सांगली या मार्गांवर सेवा सुरू करण्याचा विचार महामंडळाकडून केला जात आहे. या वर्षी शिवनेरीचे भारमान ६0 टक्के आहे. नफा ना तोटा तत्त्वावरही शिवनेरीचे भारमान पाहिले, तर ते सरासरी 44%एवढे आहे. एसटीतील एकूणच चलनीय स्थितीत शिवनेरीचा वाटा हा एक टक्का असून, उत्पन्नात तो दोन टक्के वाटा आहे.