शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

Ssc Result 2020: हम भी है जोश मे..! दहावीच्या निकालात राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 12:45 IST

दिव्यांग विद्यार्थ्यांचा एकुण निकाल ९२.७२ टक्के एवढा

ठळक मुद्देराज्यभरातील परीक्षा दिलेल्या एकुण विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ८४४ विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : दिव्यांग विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. राज्यभरातील परीक्षा दिलेले एकुण ८ हजार ४५९ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ८४४ विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. या विद्यार्थ्यांचा एकुण निकाल ९२.७२ टक्के एवढा आहे. तर वाढ खुंटलेले, थॅलेसिमिया, मज्जासंस्थेचा आजार, स्वमग्न या गटातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान विविध सवलती दिल्या जातात. या सवलतींचा आधार घेत विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. परीक्षेसाठी राज्यभरातून नोंदणी केलेल्या ८ हजार ५२२ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ४५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७ हजार ८४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकुण २२ गटातील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी अस्थिव्यंग गटामध्ये सर्वाधिक १८०५ विद्यार्थी होते. तसेच कर्णबधिर (१६७०), अध्ययन अक्षम (१५८८) व दृष्टीहीन (१२०३) या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. तर सर्वात कमी अ‍ॅसिड हल्ला झालेले व पार्किन्सन आजारातील गटात प्रत्येकी एक विद्यार्थी होता. वाढ खुंटलेले (२९), थॅलेसेमिया/कॅन्सर (२८), मज्जासंस्थेचा आजार (२५), स्वमग्न (४९), हेमोफिलिया (२३) या गटात परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच सिकलसेल गटात परीक्षा दिलेल्या १२२ विद्यार्थ्यांपैकी १२१ विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. वाचा व भाषा अक्षमत्व या गटातील २६ विद्यार्थ्यांपैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता बारावीच्या निकालात दिव्यांग विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले होते. -------------दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल -विद्यार्थी।   परीक्षेला बसलेले उत्तीर्ण   टक्केवारीदृष्टीहीन ११९०        ११४३             ९६.०५कर्णबधिर १६७०      १४३८            ८६.१०अस्थिव्यंग १८०५      १६६९          ९२.४६बौध्दिक अक्षम ६४२   ५७८।          ९०.०३अध्ययन अक्षम १५८८ १५६१          ९८.२९वाढ खुंटलेले २९              २९                १००थॅलेसेमिया/कर्करोग २८      २८             १००मज्जासंस्थेचा आजार २५   २५             १००स्वमग्न                 ४९       ४९            १००हेमोफिलिया        २३       २३              १००सिकलसेल        १२२     १२१            ९९.१८इतर                १२८८   ११८०         ९१.६१--------------------------------------------------एकुण         ८४५९        ७८४४          ९२.७२-------------------------------------------------