शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयचे कार्य श्रीनिवासन यांच्या इशार्‍यावरच : अब्दी

By admin | Updated: May 9, 2014 00:07 IST

निलंबित राजस्थान क्रिकेट संघटना आणि बीसीसीआय यांच्यादरम्यान सुरू असलेला वाद आज आणखी चिघळला. आरसीएचे उपाध्यक्ष मोहम्मद अब्दी यांनी बीसीसीआयवर टीका केली.

नवी दिल्ली : निलंबित राजस्थान क्रिकेट संघटना आणि बीसीसीआय यांच्यादरम्यान सुरू असलेला वाद आज आणखी चिघळला. आरसीएचे उपाध्यक्ष मोहम्मद अब्दी यांनी बीसीसीआयवर टीका केली. मोदी यांच्यावर आजीवन बंदी असताना त्यांची आरसीएच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे बीसीसीआयने आरसीएवर निलंबनाची कारवाई केली आणि नियमानुसार कार्य केल्याचा दावा केला, असे सांगताना देशात क्रिकेटचे संचालन करणार्‍या संस्थेची कारवाई आश्चर्यचकित करणारी असल्याचे मत अब्दी यांनी व्यक्त केले. आपीएल सट्टेबाजी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीमुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदापासून दूर जावे लागलेल्या एन. श्रीनिवासन यांच्यावर टीका करताना अब्दी म्हणाले, ‘बीसीसीआयचे कार्य अद्याप श्रीनिवासन यांच्याच इशार्‍यावर सुरू आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘बीसीसीआयच्या व्यक्तिकेंद्रित दृष्टिकोनामुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे संघटनेवरील विश्वासावर प्रश्न उपस्थित झाला आहे. श्रीनिवासन यांच्यासाठी बीसीसीआयने गेल्या पाच वर्षांत अनेकदा नियमांमध्ये बदल केला आहे. बीसीसीआयमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींसाठी नियमही बदलले जातात. लोकतांत्रिक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर केवळ ललित मोदी यांना रोखण्यासाठी आरसीए समितीला निलंबित करण्यात आले. बीसीसीआयचे निर्णय अद्याप श्रीनिवासन हेच घेत असल्याचे आरसीएवरील निलंबनाच्या कारवाईमुळे हे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष शिवलाल यादव यांची संस्थेवर पकड नसल्याचे दिसून येत आहे. शिवलाल यादव हे कळसूत्री बाहुल्याप्रमाणे आहेत. प्रभारी अध्यक्ष असल्यामुळे यादव यांच्याकडे कुठल्या राज्य संघटनेला मान्यता देण्याचा किंवा मान्यता रद्द करण्याचा अधिकार नाही. मान्यता देण्याचा आणि रद्द करण्याचा अधिकार आमसभेला आहे.’ (वृत्तसंस्था)

अब्दी म्हणाले, ‘बीसीसीआयची कारवाई अहंकार स्पष्ट करणारी असून देशातील कायदा व जनभावनेची उपेक्षा करणारी आहे. आरसीएवरील कारवाई घटनाविरोधी आहे. बीसीसीआयचा निर्णय आश्चर्यचकित करणारा आहे. घटनेनुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बीसीसीआयने संघटनेवर निलंबनाची कारवाई केली.’ -मोहम्मद अब्दी, आरसीएचे उपाध्यक्ष