शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियातून संस्कृतचा प्रसार

By admin | Updated: April 29, 2016 03:22 IST

विद्यार्थ्यांना प्राचीन ग्रंथांतील संस्कृत सुभाषिते कळावीत यासाठी सोमय्या महाविद्यालयाच्या भारतीय संस्कृती पिठमने पुढाकार घेतला अहे.

मुंबई : विद्यार्थ्यांना प्राचीन ग्रंथांतील संस्कृत सुभाषिते कळावीत यासाठी सोमय्या महाविद्यालयाच्या भारतीय संस्कृती पिठमने पुढाकार घेतला अहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राचीन ग्रंथाचा प्रसार करण्यात येत आहे. मोबाईल आणि सोशल मीडियात गुंतलेल्या विद्यार्थ्यांना साऱ्या गोष्टी एका क्लिकवर हव्या असतात. त्यामुळे जाडजूड ग्रंथ हाताळण्याचा त्यांना कंटाळा येतो. संस्कृत भाषेचे जतन व्हावे आणि तिची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी विद्याविहार येथील क.जे. सोमय्या महाविद्यालयाच्या भारतीय संस्कृती पिठमने सोशल मीडियावर ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्य, व्यायाम, आहार, दैनंदिन जीवन, मन, आर्थिक व्यवहार, नेतृत्व गुण विषयावरील विविध प्राचीन ग्रंथांतील सुभाषिते पाठवण्यात येतात. सोमवार, बुधवार, शुक्रवारी ग्रुपमधील विद्यार्थ्यांना संस्कृत सुभाषिते पाठवली जातात. आणि त्यावर चर्चा केली जाते. फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप आणि हँगआऊट्स या इन्स्टंट मेसेजिंगच्या साहाय्याने लिखित आणि ध्वनी स्वरुपातील संस्कृत सुभाषिते ४ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांना पाठवली जातात. संस्कृत भाषेची गोडी निर्माण व्हावी आणि प्राचीन ग्रंथाची अधिकाधिक माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत, असे भारतीय संस्कृत पिठमच्या संचालक कला आचार्य यांनी सांगितले.