मुंबई : अपघात होण्याआधी अभिनेता सलमान खान एका हॉटेलमध्ये होता व तेथे वाहन पार्क करताना तो चालकाच्या जागेवर होता़ मात्र हॉटेलमधून जाताना सलमानची गाडी कोण चालवत होता हे मला माहिती नाही, अशी साक्ष एका साक्षीदाराने गुरुवारी सत्र न्यायालयात दिली़कल्पेश वर्मा असे या साक्षीदाराचे नाव आहे़ वर्मा हे वांद्रे येथील त्या हॉटेलमधील वाहनतळात कामाला होते़ ते साक्ष देताना म्हणाले, सलमान वाहनतळात वाहन पार्क करण्यासाठी आला होता़ त्याने पार्किंगचे पैसे भरल्यानंतर ५०० रुपयांचे बक्षीसही दिले़ मात्र हॉटेलमधून जाताना सलमानची गाडी कोण चालवत होता हे मी सांगू शकत नाही़त्यावर सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी सलमानने पार्किंगचे पैसे भरल्याची पावती सादर होऊ शकते का, असा सवाल वर्मा यांना केला़ ही पावती आपण पोलिसांना दिल्याचे वर्मा यांनी न्यायालयाला सांगितले़या वेळी अमिन शेख या साक्षीदाराचीही साक्ष नोंदवण्यात आली़ ते म्हणाले, त्या दिवशी मी अपघात झालेल्या त्या बेकरीजवळ झोपलो होतो़ अपघात झाला तेव्हा मोठा आवाज झाला़ त्या वेळी तेथे जमलेले सर्व जण सलमानला गाडीतून बाहेर येण्यास सांगत होते़(प्रतिनिधी)
पार्किंगवेळी सलमान चालकाच्या जागेवर
By admin | Updated: October 10, 2014 05:48 IST