अकोला: राज्यातील क्रीडा चळवळीला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यातील विविध क्रीडा संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच शाळा-महाविद्यालयांना शासनाच्या वतीने भरघोस अर्थसहाय्य केले जाणार आहे. पुणेस्थित क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने यासाठी एक योजना तयार केली आहे. त्या योजनेंतर्गत संस्थेला ७५ टक्के अनुदान दिले जाणार असून, २५ टक्के खर्च संबंधित संस्थेला करावा लागणार आहे. राज्यात गुणवान खेळाडूंची कमरता नाही; परंतु पुरेसे प्रशिक्षण व आर्थिक पाठबळ मिळत नसल्यामुळे, अनेक खेळाडूंचा खेळातील रस संपतो व ते नाईलाजाने दुसर्या कुठल्या तरी कामात गुंतुन जातात. यापुढे असे होऊ नये, खेळाडूंना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे आणि क्रीडा चळवळ गतिमान व्हावी, यासाठी क्रीडा संस्थांना क्रीडांगण तयार करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. व्यायामशाळा आणि ह्यइनडोअरह्ण स्टेडियम उभारण्यासाठीदेखील या निधीचा उपयोग करता येणार आहे. खाजगी क्रीडा संस्थांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था व शाळा-महाविद्यालयांना देखील या क्रीडा अनुदानाचा लाभ मिळणार आहे. माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, तंत्रशिक्षण व वैद्यकीय महाविद्यालयेदेखील अनुदानास पात्र राहणार आहेत. याशिवाय विविध खेळांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या आणि सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५0 किंवा संस्था नोंदणी अधिनियम १८६0 अन्वये मान्यता असलेल्या व्यायाशाळा, क्रीडा मंडळे, क्रीडा संघटना, युवक मंडळ, महिला मंडळे, आदिवासी आश्रमशाळा, तसेच शासनाच्या वतीने विकसीत करण्यात आलेल्या क्रीडा संकुलांनाही हे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.या आर्थिक सहाय्यासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज २५ जुलैपर्यंत संबंधित जिल्हा क्रीडा कार्यालयात जमा करता येणार आहेत.
क्रीडा संस्थांना मिळणार भरघोस अनुदान
By admin | Updated: July 13, 2014 01:02 IST