मुंबई : तालुका क्रीडा संकुलांचे आतापर्यंत तहसिलदारांकडे असलेले अध्यक्षपद आता आमदारांना देण्यात येणार आहे. तहसिलदार हे समितीचे सदस्य सचिव असतील. एका मतदारसंघात दोन क्रीडा संकुले असतील तर एकाचे अध्यक्षपद वि धान परिषद सदस्याला दिले जाईल. क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.देशातील नामवंत खेळाडूंना राज्य शासन आमंत्रित करेल, त्यांना महाराष्ट्रातील गुणी खेळाडूंची निवड करण्यास सांगेल. प्रत्येक क्रीडा प्रकारातील पन्नास खेळाडू निवडून त्यांची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कामगिरीसाठी पुढील पाचसहा वर्षे तयारी करवून घेण्यात येतील, असे तावडे यांनी सांगितले. राज्यातील महापालिकांनी विविध स्पर्धांमध्ये आपले व्यावसायिक संघ उतरवावेत आणि त्यासाठी खेळाडूंना कंत्राटी पद्धतीवर सामावून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पॅराआॅलिम्पिक स्पर्धेत पदक विजेत्या अपंग खेळाडूंना बक्षिसे आणि नोकऱ्यांध्ये आरक्षण दिले जाईल, असे मंत्र्यांनी जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)
क्रीडा संकुलांचे अध्यक्षपद आमदारांकडे
By admin | Updated: April 8, 2015 01:15 IST